नवीन लेखन...

रंग दुनियेचे . . (गझल)

हात जेव्हां हे जळाया लागले रंग दुनियेचे कळाया लागले . ठाकतां संकट, पळाल्या वल्गना पायही मागे पळाया लागले . जग दगा देताच, देती नयनही रोखलें, तरिही गळाया लागले . पाप किंवा पुण्य ना गतजन्मिंचें येथलें येथें फळाया लागलें . शुभ्र वसनें, डाग वर इवलाहि ना आंतुनी पण मन मळाया लागलें . पीठ खाण्यां सज्ज कुत्रे राजसी […]

मुखवटे (गझल)

भोवती बघतो तिथें दिसतात सारे मुखवटे होय रे, मंचावरी असतात सारे मुखवटे ! बदलतो माणूस वस्त्रें, बदलतो आत्मा कुडी बदलती नेते तसे त्यांच्या मनाचे मुखवटे ।। रौद्र वादळ वा पुराचें चाललें थैमान जे थंड काचेतून बघती थंड उडते मुखवटे ।। रोज जे घेती सुपार्या, निजशिशुस नवनीत ते ओळखा, कुठले खरे ते, आणि कुठले मुखवटे ।। भामट्यांचा […]

अजुनही माणूस तूं

हर्ष आहे शोक आहे, अजुनही माणूस तूं त्याहुनी आश्चर्य आहे – अजुनही माणूस तूं ! राग हृदयीं लोभ हृदयीं अन् असूया द्वेषही सर्व दुर्गुण असुनही हे, अजुनही माणूस तूं ? ईश ना शकसी बनूं, सैतान तरि होऊं नको त्यापरी स्वीकार कर हें – अजुनही माणूस तूं ।। कधिच तूं बनलास फत्तर, तरि कधी नयनातलें सांगतें जें […]

मदमत्त मुजोर टगे

मदमत्त मुजोर टगे भरले सभोवताली फुटके नशीब माझे गुंडांचिया हवाली ।। दिनरात राबतां मी, दो घास फक्त हातीं खेचून घेत तेही उपरेच शक्तिशाली ।। काळोख मिट्ट, तरि ना मागूं धजे दिवा मी घर पेटवून द्याया चहुंवर खड्या मशाली ।। माझ्यामुळेच ज्यांचा जगिं मान वाढताहे दाबून ओठ, करतो त्यांचीच मी हमाली ।। मधुनीच हात स्फुरती, पण हाय […]

ही माझी शाळा

आहे ती लहान    परि किर्ती महान, छोटे येऊन शिकले   मोठे होऊन गेले ।।१।।   आले घेऊन पाटी    अ आ इ ई लिहिण्यासाठी, लिहून वाचून ज्ञानी बनले    देशांत नांव कमविले ।।२।।   शहर चालते, देश चालतो    महान बनले लोकांमुळे ।।३।। बीजांचे वृक्ष झाले    त्या केवळ शाळेमुळे ।।४।।   कुणी बनला डॉक्टर   काळजी घेई आरोग्याची, कुणी झाला इन्जिनियर […]

चक्रव्यूह

ठोका खोकी बनवा खोपी ही झोपडपट्टी गटारावरी भटारखाना आणि हातभट्टी.  ||१|| ओसंडे घन दुर्गंधि-घाण कचरा सडला तिथेच भ्रामक जीवन नामक खेळ मांडला.   ||२|| रोज ठणाणा नविन घोषणा सुधारणांच्या. शून्यें असतीं नांवावरती सरकारांच्या.   ||३|| मंत्री येतां जिवंत प्रेतां बघुन न बघती गोठ्यामधली ढोरें सगळी तशीच ज़गती.   ||४|| चक्रव्यूह रणिं रचला कोणी मुळी न ठाउक […]

जॅक दि जायंट-किलर

उंच उंच आभाळात सरळसोट चढत गेलेला खांब; ढगांना फाडून वरती गेलेला, जादूचा, अर्ध्या रात्रीत उभा झालेला. खांबावर जॅक सरसर चढतो, ढगांच्याही वर, काचेच्या पेंटहाऊसपर्यंत. मऊ मऊ गालिचावर पावलें वाजतच नाहींत, दाणदाण काय, अजिबातच नाहींत. गरम गरम अन्न पुढे येतं, पण जॅकला गिळतच नाहीं. जॅक तसाच उठतो, आणि कुरवाळत बसतो सोन्याचं अंडं देणारी कोंबडी. कोंबडीला कुरवाळून, सुरक्षित […]

सर्व जीवांना जगूं द्या

जाळी जळमटे वाढूं लागली, घरा भोवती  । किडे नि मुंग्या झुरळे,  यांची रेलचेल होती  ।। चिवचिव करीत चिमण्या,  येती तेथे  । काड्या-कचरा आणूनी,  घरटी बांधत होते  ।। झाडून  घेई हळूवारपणे, तो कचरा  । भिंती आणि माळ्यावरी ठेवी,  तसाच पसारा  ।। स्वातंत्र्याची मुभा होती,  झुडपांना तेथे  । स्वच्छंदानें अंगणी वाढती,  सर्व दिशांनी ते  ।। जगणे आणि जगू […]

खरी स्थिती

मला नाही मान, मला नाही अपमान, हेच तूं जाण, तत्व जीवनाचे ।।१।।   कुणी नाही सबळ, कुणी नसे दुर्बल, हा मनाचा खेळ, तुमच्या असे ।।२।।   कुणी नाही मोठा, कुणी नसे छोटा, प्रभूच्या ह्या वाटा, सारख्याच असती ।।३।।   विविधता दिसे, ती कृत्रिम असे, निसर्गाची नसे, ती वस्तूस्थिती ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com   […]

मक्षिकेचे आत्मसमर्पण

उडत उडत एक मक्षिका, देवघरांत शिरली, पूजा- साहित्य आणि मूर्तीवरी स्वच्छंदानें नाचूं लागली ।।१।। धुंदीमध्ये बागडत होती, मूर्तीच्या बसे शिरावरी, धूप, गंध आणि सुमनावरूनी, जाई मध्येच प्रभू चरणावरी ।।२।। पंख चिमुकले हलवीत ती, मूर्तीपुढें गांऊ लागली, प्रसाद दिसतां पंचामृताचा, प्रभू अर्पिण्यासी झेपावली ।।३।। नैवेद्याच्या क्षीर सागरीं, आत्मसमर्पण तिने केले, प्रभू सेवेत तल्लीन होऊनी, जन्माचे सार्थक केले […]

1 355 356 357 358 359 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..