नवीन लेखन...

दु:खात सर्व शिकतो

दु:खातची शिकतो सारे, उघडोनी मनाची द्वारे  । दु:खा परी नसे कुणी, जो सांगे अनुभवाने  ।।१।।   दु:ख मनावरी बिंबविते, वस्तुस्थितीची जाणीव देते  । दुसऱ्या परि आस्था देई, जाणीव ठेवूनी कार्य करते  ।।२।।   अधिकाराने माज चढतो, खालच्यांना तुच्छ लेखतो  । जाता हातातूनी अधिकार, माणूसकी काय? हे कळणार  ।।३।।   कष्ट करण्याची वृत्ती येते, सर्वांना समावून घेते  […]

व्योमातुन अवतरला गजमुख

अंतराळ-यायित्राकासारखा धारुन गणवेश व्योमातुन अवतरला गजमुख, देव-गणाधीश ।। १ सोंडेसम भासतो मुखवटा, ‘प्राणवायु’ पुरवी संरक्षक अवकाश-कवच त्या तुंदिलतनु बनवी ध्वनिसंवर्धक मुखाजवळ, जणुं हस्तिदंत एक शूर्पकर्णसम बशीमधे केंद्रित ध्वनि प्रत्येक अश्वहीन रथ मूषक भासे, पुच्छ धूम्ररेष ।। व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। २ प्रकाशगतिनें कुठून आला लक्ष-लोक लांघुनी भूवर कधि, कितिदा अवतरला, नच जाणे कोणी कोटिकोटि मानव-जन्मांच्या […]

आनंदमय जाग

हलके हलके निशा जाऊनी, उषेचे ते आगमन होई, निद्रेमधल्या गर्भामध्यें, रवि किरणांची चाहूल येई ।।१।।   त्या किरणांचे कर पसरती, नयना वरल्या पाकळ्यावरी, ऊब मिळता मग किरणांची, नयन पुष्पें फुलती सत्वरी ।।२।।   जागविती ते घालवूनी धुंदी, चैत्यन्यमय जीवन करी, जादूचा हा स्पर्श असूनी, न भासे किमया दुजापरी ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com   […]

मिष्किल तारे

चमकत होते अगणित तारे, आकाशी लुकलुकणारे । लक्ष्य वेधूनी घेतां घेतां, फसवित होते आम्हांस सारे ।।१।।   कधी जाती चटकन मिटूनी, केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी । खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी ।।२।।   एक एक जमती नभांगी, धरणीवरल्या मांडवी अंगीं । संख्या त्यांची वाढतां वाढतां, दिसून येती अनेक रांगांनी ।।३।।   हसतो कुणीतरी […]

तल्लीनतेत आहे ईश्वर

श्रीकृष्णाचे जीवन  बनली एक गाथा, यशस्वी होई तुमचे जीवन  चिंतन त्याचे करिता ।।१।। तल्लीनतेच्या गुणामध्यें   लपला आहे ईश्वर, तल्लीनतेचा आनंद लुटा  शिकवी तुम्हा मुरलीधर ।।२।। बालपणीच्या खेळामध्ये   जमविले सारे सवंगडी, एकाग्रतेने खेळवूनी    आनंद पदरीं पाडी ।।३।। मुरलीचा तो नाद मधूर    मन गेले हरपूनी, डोलूं लागले सारे भवतीं    मग्न झाल्या गौळणी ।।४।। टिपऱ्या घेवूनी नाच नाचला    गोपी […]

चि. पल्लवीस

भरून आले डोळे जेंव्हां, कढ मायेचे उचंबळले, हृदयामधल्या भावनेला, अचानकपणे मार्ग मिळाले ।।१।। प्रेमळ निर्मळ तसेच सात्वीक, लोभसवाणे रूप मनोहर, आपुलकीने मने जिंकलीस, आनंदूनी सान थोर ।।२।। वागणुकीत दिसते किमया, हवी हवीसची तू सर्वांना, टिकवूनी ठेव गुणविशेष हा, यशस्वी करील तव जीवना ।।३।।  डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 353 354 355 356 357 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..