नवीन लेखन...

देह एक बदलणारे घर

बदलत गेलो घरे मी माझी, आज पावतो कितीक तरी  । पोटासाठीं नोकरी करतां, भटकत होतो आजवरी  ।।   बालपण हे असेंच गेले, फिरता फिरता गावोगावी  । वडिलांची  नोकरी होती, धंदा करणे माहीत नाही  ।।   पाऊलवाट तीच निवडली, मुलाने देखील जगण्यासाठी  । तीन पिढ्या ह्या चालत राही, एका मागून एकापाठी  ।।   गेले नाहीं आयुष्य सारे, […]

मातृत्वाची कन्येस जाण

आई होऊन कळले मजला, कष्ट आईचे आज खरे  । स्वानुभवे जे जाणूनी घेई, तुलना त्याची कोण करे ।।१।।   नऊमास तू जपला उदरी, क्षणाक्षणाला देऊनी शक्ती  । बाह्य जगातून शोषून सारे, सत्व निवडूनी गर्भा देती ।।२।।   देहावरी आघात पडता, झेलूनी घेई सारे कांहीं  । बाळ जीवाला बसे न धोका, हीच काळजी सदैव राही ।।३।।   […]

डाग!

कितीही देशी शीतल चांदणेX आनंदाचा ठरुनी मेरुमणी काट्यापरि हा मध्येंच बोचतो डाग तुझा लक्ष्य खेचूनी   ठाऊक नाहीं कधीं कुणाला कसा लागला डाग उरीं पडला असेल चुकून देखील कुणी रंग उधळतां वेड्यापरि   शुभ्रपणाचा मानबिंदू हा डागरहित जीवन त्याचे केवळ एका डागापायीं सत्य झांकाळते कायमचे   मिटून जातां डागही मिटतो उरते मागें सत्य तेवढे परि पुसण्यासाठी […]

खरे श्रेष्ठत्व

कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला   ।    मानव हा आत्मस्तुती करतो   । कुणा न येती भाषा बोली    ।    हीच गोम हा जाणून घेतो  ।। निसर्गाने उधळण केली  ।  अनेक गुणांची   । मानवाच्या हाती लागली   ।   ‘कला’ कल्पकतेची   ।। विचारांच्या झेपामधूनी  ।    आकाश पातळ गाठले   । प्रगतीच्या ह्या छलांगानी  ।    श्रेष्ठत्व  ठरविले   ।। दुर्बल केले इतर प्राणी  ।   आणि […]

(काव्य) : प्राउड टु बी अॅन् इंडियन (?)

(न्यू यॉर्कमध्ये ‘इंडिया डे’ साजरा झाला, त्यानिमित्तानें ) ‘आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन ! कम ऑऽन, से द सेऽम इव्हरीवन्’ . १ आमचा शेजारी-देश आमचा घास गिळतो आणि नंतर आम्हालाच छळतो आम्हाला कळतंय् त्याचं तंत्र पण जपतोय् ना आम्ही ‘अहिंसेचा मंत्र’ ! अहो, कुणाला कशी द्यायची उत्तरं हें आधी ठरवा तर खरं अन् मग […]

कृष्णजन्माष्टमीनिमित्त : गोकुळ – (१ ) : कान्हा अवतरला

पुराणिक वर्णन करत आहे : मध्यरात्र तेजानें उजळे, भास्कर झळमळला देवकी-वसुदेवाच्या पोटीं कान्हा अवतरला ।। मध्यरात्रिची घटिका भरली देवकिची काया थरथरली कारागृह-कोठडित अलौकिक-प्रकाश झगमगला ।। हर्षित-अति वसुदेव होतसे लगेच भीती ठाव घेतसे कंसभयानें पिता सुतासाठी मनिं तळमळला ।। क्षणीं उचललें श्यामल बाळा टोपलीत घालून निघाला गळुन शृंखलांच्या खळखळुनी पडल्या जड माळा ।। आपोआप उघडली दारें झोपी […]

झीज

रात्रंदिनी कष्ट करूनी, झिजवत होता आपले हात, जीवनांतल्या धडपडीमध्यें, दिसे त्याची स्थितीवर मात ।।१।।   पर्वा नव्हती स्व-देहाची, झिजवत असता हात ते, जाण होती परि ती त्याला, हेच कष्ट  जगवित होते ।।२।।   श्रम आणि भाकरी मिळूनी, ऊर्जा देई तिच शरीराला, ऊर्जेनेच तो देह वाढवी, समाधान जे मिळे त्याला ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – […]

कर्ममुक्ती

न राही तुमचे ते कर्म, ज्यात प्रभू इच्छा अंतीम….१,   प्रत्येक घटनेचे अंग, त्यात मुख्य ईश्वरी भाग….२   तुमच्या मार्फतच होई त्याचा इशारा कोण पाही….३,   सर्व समजे मीच केले अहंकाराने मन भरले….४,   षडरिपू असे साधन खेळविता यावे म्हणून…५,   राग,लोभ, मोह मायादी ठेवती वाटते आनंदी….६,   परि याच्याच शक्तीने प्रभू खेळ चाले युक्तीने….७,   […]

आठवण

अनामिक जे होते पूर्वी, साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ येतां क्षणी, हृदये त्यांची जूळूनी गेली  ।।१।।   शंका भीती आणि तगमग, असंख्य भाव उमटती मनी  । विजयी झाले ऋणानुबंध, बांधले होते हृदयानी  ।।२।।   उचंबळूनी दाटूनी आला, हृदयामधला ओलावा  । स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा  ।।३।।   मनी वसविल्या घर करूनी, क्षणीक […]

मन तुझे कां गहिवरले ?

भाळी नसता कुंकंम तुझ्या गे विरचक्र हे हातीं आले मरणोत्तर हा किताब मळतां मन तुझे कां गहिवरले ?   शुर विराची अर्धांगिनी तू युद्धभूमिवर त्यास धाडीले ओवाळूनी निरोप देतां मन तुझे कां गहिवरले ?   देश सेवेत कामी यावे ब्रिद त्याचे मनी ठसविले सांगत असतां हेच दुजांना मन तुझे कां गहिवरले ?   सुर्वणाक्षरीं वाचून गाथा […]

1 351 352 353 354 355 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..