३ – गजानना, तव स्तवन चहुंकडे सुरूं
गजानना, सृष्टि ही चराचर तुझेंच प्रिय लेकरू विश्वपसारा तुझी कृती, तव स्तवन चहुंकडे सुरूं ।। ‘न’ चें रक्षी द्वित्व. नारि-नर, भूचर, तरु-लतिका ‘ज’कार रक्षी, गजानना, जलचर अन् कृमि-कीटकां ‘ग’कार तव रक्षी गगनींचें प्रत्येकच पाखरूं ।। संथ करत तव मंत्र-पठण, गायी ‘ॐ गँ गणपती’ नित करतो तव जप पोपट, कुक्कुट काकड-आरती कोकिळ-कंठा लागे सुमधुर अथर्वशीर्ष […]
