अशी अामची भक्ती देवा
अशी अामची भक्ती देवा प्रभादेवीला धाव शेंदूर फासलेल्याला महाग हार हाडामांसाच्या प्राण्यांना स्वस्तातले{?} घांव ! ||१|| अशी अामची भक्ती देवा लालबागच्या राजा , पाव ! बायको—पोरासाठी वेळ नाहि उंडारतोय सारा गांव ! ||२|| अशी अामची भक्ती देवा महालक्ष्मीला रांग खणा—नारळाची ओटी तिला गृहलक्ष्मीला मात्र टांग ! ||३|| अशी अामची भक्ती देवा तिरुपतीला टक्कल अाई—बाप गेल्यावर कशाला […]
