पापाचा हिशोब
वेगाने तो जात असता, घटना एक घडली । तुडवले गेले जीव जंतू , त्याच्या पाययदळी ।। ज्ञात नव्हते कांहीं त्याला, त्याच्या कृत्याचे । स्वकर्मा मध्ये गुंतले होते, एक चित्त त्याचे ।। नजर गेली अवचित त्याची, एका सरड्यावरती । दगड मारूनी बळी घेतला, असूनी अंतरावरी ।। पापाचा बने भागीदार, मारूनी सरड्याला । अकारण कृत्य जे केले, पात्र […]
