नवीन लेखन...

१ – मोरया हो

देवा मोरया हो , राया मोरया हो अमुच्या गेहीं जन्म-उत्सवीं प्रतिवर्षीं या हो  ।।   हे गौरीसुत मंगलमूर्ती दिगंत गाजे तुमची कीर्ती रूप मनोहर, हे लंबोदर, दृष्टि नित्य पाहो  ।।   मुख हें, गजमुख-स्तोत्रगायना कर उधळोत तुम्हांवर सुमनां तुमच्या पुण्यद पायांवर हा नित माथा राहो  ।।          प्रदक्षिणा पद करो मंदिरा कान ऐकुं दे तव शुभ-मंत्रा […]

आत्म्याची हाक

उचंबळूनी येतील शब्द,  हृदयामध्ये दडले जे  । संदेश असता सर्वांसाठी,  कुणी न म्हणतील ते माझे  ।। जे जे काही स्फूरूनी येते,  जेव्हा अवचित समयी  । हृदयामधली हाक असे,  ठरते आनंद दायी  ।। ‘आनंद’ आहे कोणता हा,  अन् येई कोठूनी  । अंतर्यामी सर्वांच्या ,  सदैव राही  बैसूनी  ।। बाहेर पडूनी झेप घेई   दूजा हृदयावरी  । तेथेही जो […]

विचार, भावना व अंतरज्ञान

विचार, भावना अंतरज्ञान, संगत असते तिन्हीची यशस्वी करण्याजीवन, मदत लागते सर्वांची….१   तर्कशुद्धता ठरण्यासाठी, विसंगतीचा घेई आधार जीवनाचे सत्य उकलण्या, बुद्धी करीत राही विचार…२,   राग लोभ प्रेमादी गुण, जीवनाची चमकती अंगे, ‘भावनेचा’ आविष्कार होतां, एकत्र सर्वां चालण्या सांगे….३,   शोध घेत असता सत्याचा, अनेक अडचणी येती, सत्य हेच असूनी ईश्वर, अंतरज्ञान तेच पटविती….४   डॉ. […]

तृप्त मन

एक भिकारी लीन-दीन तो, भीक मागतो रस्त्यावरी, फिरत राही एकसारखा, या टोकाकडून त्या टोकावरी ।।१।।   दिवस भराचे श्रम करूनी, चारच पैसे मिळती त्याला, पोटाची खळगी भरण्या, पुरून जाती दोन वेळेला ।।२।।   मिठाई भांडारा पुढती, उभा ठाकूनी खाई भाकरी, केवळ मिठाईचा आस्वाद, त्याच्या मनास तृप्त करी ।।३।।   देहाखेरीज कांहीं नव्हते, त्याचे ‘आपले’ म्हणण्यासाठी, परि […]

गोकुळ (२) : लई वांड पोर ह्यो

गोपबालक : लई वांड पोर ह्यो दही-लोनी-चोर ह्यो आईबापाच्या जिवा लावतो घोर ह्यो ; हा खेळगडी गोपाळसौंगडी , लई आवडतो समद्यांना. माहाऽ किसनाऽ, माहाऽ कान्हाऽ ।। १ पोट्ट्याची हौसच मोपऽ डोईवरी पिसांचा टोपऽ , सावळा जरी तोंडीं तरतरी धोतर भरजरी, ऐटीत चालतो गडीऽ खांद्यावरती घोंगडीऽ , लटके काठीला जाडऽ , दशमीचं जड गाठुडं लोट्यात दूध थ्वाडं […]

देह एक बदलणारे घर

बदलत गेलो घरे मी माझी, आज पावतो कितीक तरी  । पोटासाठीं नोकरी करतां, भटकत होतो आजवरी  ।।   बालपण हे असेंच गेले, फिरता फिरता गावोगावी  । वडिलांची  नोकरी होती, धंदा करणे माहीत नाही  ।।   पाऊलवाट तीच निवडली, मुलाने देखील जगण्यासाठी  । तीन पिढ्या ह्या चालत राही, एका मागून एकापाठी  ।।   गेले नाहीं आयुष्य सारे, […]

मातृत्वाची कन्येस जाण

आई होऊन कळले मजला, कष्ट आईचे आज खरे  । स्वानुभवे जे जाणूनी घेई, तुलना त्याची कोण करे ।।१।।   नऊमास तू जपला उदरी, क्षणाक्षणाला देऊनी शक्ती  । बाह्य जगातून शोषून सारे, सत्व निवडूनी गर्भा देती ।।२।।   देहावरी आघात पडता, झेलूनी घेई सारे कांहीं  । बाळ जीवाला बसे न धोका, हीच काळजी सदैव राही ।।३।।   […]

डाग!

कितीही देशी शीतल चांदणेX आनंदाचा ठरुनी मेरुमणी काट्यापरि हा मध्येंच बोचतो डाग तुझा लक्ष्य खेचूनी   ठाऊक नाहीं कधीं कुणाला कसा लागला डाग उरीं पडला असेल चुकून देखील कुणी रंग उधळतां वेड्यापरि   शुभ्रपणाचा मानबिंदू हा डागरहित जीवन त्याचे केवळ एका डागापायीं सत्य झांकाळते कायमचे   मिटून जातां डागही मिटतो उरते मागें सत्य तेवढे परि पुसण्यासाठी […]

खरे श्रेष्ठत्व

कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला   ।    मानव हा आत्मस्तुती करतो   । कुणा न येती भाषा बोली    ।    हीच गोम हा जाणून घेतो  ।। निसर्गाने उधळण केली  ।  अनेक गुणांची   । मानवाच्या हाती लागली   ।   ‘कला’ कल्पकतेची   ।। विचारांच्या झेपामधूनी  ।    आकाश पातळ गाठले   । प्रगतीच्या ह्या छलांगानी  ।    श्रेष्ठत्व  ठरविले   ।। दुर्बल केले इतर प्राणी  ।   आणि […]

(काव्य) : प्राउड टु बी अॅन् इंडियन (?)

(न्यू यॉर्कमध्ये ‘इंडिया डे’ साजरा झाला, त्यानिमित्तानें ) ‘आय् अॅम् प्राउड टु बी अॅन् इंडियन ! कम ऑऽन, से द सेऽम इव्हरीवन्’ . १ आमचा शेजारी-देश आमचा घास गिळतो आणि नंतर आम्हालाच छळतो आम्हाला कळतंय् त्याचं तंत्र पण जपतोय् ना आम्ही ‘अहिंसेचा मंत्र’ ! अहो, कुणाला कशी द्यायची उत्तरं हें आधी ठरवा तर खरं अन् मग […]

1 345 346 347 348 349 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..