नवीन लेखन...

५ – स्वीकार नमस्कार माझा

हे गणस्वामी, हे गणनाथा, हे श्रीगणराजा विविध शुभंकर नामीं स्वीकार नमस्कार माझा  ।।   हस्तिमुखा हे,  महाकर्ण हे,  हे श्रीगजानना, वक्रुतुंड हे,  एकदंत हे,  हे श्रीगजवदना, हेरंबा, श्रीगणेश, मोरेश्वरा, धुंडिराजा   ।। विविध शुभंकर नामीं स्वीकार नमस्कार माझा  ।।   ऋद्धिसिद्धिस्वामी, विघ्नेश्वर, हे गौरीतनया, हे चिंतामणि, भालचंद्र, दंती, श्रीगणराया, धूम्रवर्ण हे,  शूर्पकर्ण हे,  नमन विघ्नराजा   ।। विविध शुभंकर नामीं […]

मोक्ष अंतीम फळ

मागील कर्म पुढे चालूनी, कर्माची होई शृखंला, फळ मिळते कर्मावरूनी, मदत होई मुक्तीला ।।१।।   चांगले कार्य करीतेवेळी, मृत्यू येता अवचित, पुनर्जन्म तो मिळूनी तुम्हां, खेचतो त्याच कार्यात ।।२।।   अपूरे झाले असतां कार्य, ज्ञानेश्वराच्या हातून, पुनरपि येऊनी पूर्ण केले, आठरा वर्षे जगून ।।३।।   ध्रुव जगला पांच वर्षे, अढळ पद मिळवी, कित्येक जन्मीचे तपोबल, पांच […]

कवी अनिल यांच्या २ कविता

जुई पावसाची सर ओसरून जाते, उगाच तुषार भिरभिरती इवल्या इवल्या फुली भरलेल्या अंगनिथळत्या जुईभवती   आधीच हळवा सुवास कोमल त्यात जळाआत विरघळला ओल्या झुळकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला   तलम ढगांच्या सात घड्यांतून गाळीव पडते सौम्य चांदणे जाळीच्या पडद्यामधून दिसते जुईचे नितळ रूप देखणे   कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा पाचूच्या पानांत झाकून घेत शुभ्र […]

४ – ओंकारा गणनाथा

ओंकारा गणनाथा   गजवदन  बुद्धिदाता कपिल अमेया विकट मोरया, तूं जीवनदाता   ।।   युगेंयुगें तव सगुणरूप-अवतार एकदंता युगेंयुगें खल अगणित नाशुन रक्षियलें जगता युगेंयुगें जनमन, गणराया, स्तवतें तव गाथा  ।।   अविरत असते नयनांसन्मुख वक्रतुंडमूर्ती अविरत जपती हृदय आणि मुख प्रमथनाथकीर्ती अविरत झुकुनी गजमुखचरणीं नत माझा माथा   ।।   जीवन जावें तुझिया पुढती कुसुमें वाहत रे जीवन […]

३ – गजानना, तव स्तवन चहुंकडे सुरूं

गजानना, सृष्टि ही चराचर तुझेंच प्रिय लेकरू विश्वपसारा तुझी कृती, तव स्तवन चहुंकडे सुरूं  ।।   ‘न’ चें रक्षी द्वित्व. नारि-नर, भूचर, तरु-लतिका ‘ज’कार रक्षी, गजानना, जलचर  अन् कृमि-कीटकां ‘ग’कार तव रक्षी  गगनींचें प्रत्येकच पाखरूं  ।।   संथ करत तव मंत्र-पठण, गायी  ‘ॐ गँ गणपती’ नित करतो तव जप पोपट, कुक्कुट काकड-आरती कोकिळ-कंठा लागे सुमधुर अथर्वशीर्ष […]

वंदू तुजला गणराया !

हे मयुरेश्वर, श्रीसिद्धिविनायक हेरंभ, लंबोधर शुभाय प्रगटलास विविध रुपा धरणीवर ह्या तुझ्या कृपेचा आशीर्वाद द्याया वंदू तुजला प्रथपुजीताय !   बल्लाळेश्वर, वरदविनायक रूप तुझे मोहक सुंदर तुंदिल शोभे लंबोधर तुझीया दर्शना चिंता-कष्ट दूर वंदू तुजला गणाध्यक्षाय !   चिंतामणी, गिरिजात्मक आम्हीं तुझी बालके अडाणी बोबडे बोल, आमुची वाणी शहाणे करण्या सत्वर येशी भक्ती-सेवेत आम्हां गुंतवीशी वंदू […]

पुजा घाला ….

ॲडमिशन मिळाले! पुजा घाला …. नाही मिळाले ? पुजा घाला ….   पास झालात !पुजा घाला …… नापास झालात ? पुजा घाला …. नोकरी मिळाली! पुजा घाला … नाही मिळत ? पुजा घाला ….   प्रमोशन मिळाले ! पुजा घाला … नाही मिळत ? पुजा घाला …   घर घेतलेत ! पुजा घाला … घेता येत […]

२ – गँ गणपती

ॐ गँ ,  ॐ गँ ,  गँ गणपती गँ गणपती महामंत्र हेरंबाचा   प्रत्यक्ष-पराशक्ती  ।।   गकार करि साकार, मोरया , मोहक गजशुंडा गकार, गोंडस दंत वाकडा तुझा वक्रतुंडा गकार, समईमध्ये नाचे ज्योती तमहारी गकार, गर्भसमाधि गहन निजमातेच्या उदरीं गकार गणदल, कार गुणबल, गकार गहन गती  ।।   अकार अविचल आद्यस्वर अवतार तुझा मूर्त अकार, बृहद्-अवकाशपोकळी कोटिसूर्यव्याप्त […]

आरती प्राणप्रियेची

(माझी प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिचा हा ७१ वा जन्मदिन. तिच्या निधनानंतरच्या या प्रथम जन्मदिनीं, तिच्या स्मृतीला मी या अर्चनेनें अभिवादन करतो आहे.) आरती  प्राणप्रियेची तिनें उधळली माझ्यासाठी अंजलि आयुष्याची  ।।   अर्धांगी-मम, सुहास्यवदना खुलवियलें नित अमुच्या सदना तिच्यामुळे चिरहर्ष मिळे, ती साम्राज्ञी हृदयाची  ।।   संगम बुद्धी आणि कलेचा ठामपणा अन् चातुर्याचा, स्मित-शिडकावा, मर्मिक-वच  जिंकती मनें सर्वांची  […]

सत्य जीवन

हिशोब तुजला घ्यावयाचा,  मानव दरबारी थोडा, दृष्य केले जे का येथे,  मानव वाचील त्याचा पाढा ।।१।।   अदृष्य सारे कोण जाणती तुजवीण,  ना  कोणी येथे, खरा हिशोब तोच कर्माचा,  पाप असो वा पुण्य मग ते ।।२।।   नीती अनीतीच्या चाकोरीतून,  जाई कुणीतरी असा एकटा, मानवनिर्मित असेल बघून, उचलील तो मग त्यातील वाटा ।।३।।   बाह्यांगाचे कर्म […]

1 344 345 346 347 348 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..