नवीन लेखन...

गोकुळ – ३ : धुंद सुरूं रास

(चाल : पारंपारिक गरबा / डांडियाची )

नृत्य गोपगोपींचें , धुंद सुरूं रास

वृंदावन लोटलें शरद-उत्सवास  ।।

 

केशकलापीं गोपी माळती फुलें

वेण्यांचा संच दाट लांबवर झुले

चंपक, जुइ, मोगरा, दरवळे सुवास  ।।

 

वस्त्रांतुन एकएक रंग उधळती

इंद्रधनू आज जणूं लक्ष उजळती

मांडियली रूपयौवनाची आरास  ।।

 

गोलगोल नरनारीचक्र हें फिरे

झुलत डुलत नृत्य लांबवक्र हें फिरे

तालबद्ध मृदु मृदंग दास करि पदांस  ।।

 

टाळ्यांचा टिपर्‍यांचा नाद धुंद हा

विसरें निजभान पुरें सर्व वृंद हा

लुप्त या घटीस सर्व चिंता-भय-त्रास  ।।

 

आज हर्षसागरात हृदय डुंबतें

मोदाच्या वारूवर गगन चुंबतें

मनिं भुवनीं उल्हासच करितसे निवास  ।।

 

एकसाथ खालीवर श्वास होतसे

एकरूप सारे , आभास होतसे

वेगळेपणा न उरे आज शतमनांस  ।।

 

रासनृत्य नाचे आनंदकंदही

राधाही धुंद, रंगला मुकुंदही

ओठांवर मंदमधुर स्मित करी विलास  ।।

 

नृत्यसमाधीस दिव्य, शक्य न बाधा

राधामय कान्हा , कान्हामय  राधा

स्वर्गातिल सौख्य मिळे दोन प्रियजनांस  ।।

– – –

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

सांताक्रुझ (प), मुंबई.  Santacruz (W), Mumbai.

Ph-Res-(022)-26105365.  M – 9869002126

eMail   : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com /

www.snehalatanaik.com

 

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..