नवीन लेखन...

माझी जन्मपत्रिका

माझ्या बाबांच्या शुक्राणूतून आलेली २३ गुणसूत्रं माझ्या आअीच्या पक्व बीजांडातून आलेली २३ गुणसूत्रं मिळून झाला ४६ गुणसूत्रांचा माझ्या गर्भपिंडाचा आराखडा … त्यानंच ठरविलं माझं रूपमत्व, व्यक्तीमत्व आणि बुध्दीमत्व त्यानंच ठरविला माझा जीवनप्रवास त्यानंच ठरविलं माझं जन्मनक्षत्र नाडी, गण, योनी आणि जन्मरास या गुणसूत्रांत … नाही शनी, नाही मंगळ, नाही राहू नाही केतू कुणी नाही वक्री … […]

मी कोण ?

माझा जन्म….. माझ्या आअीबाबांचा निर्णय होता. या पृथ्वीवर …. जन्म घेण्याशिवाय मला दुसरा पर्यायच नव्हता…. मी… कोण? … हे मला आता समजतं ….. बाबांच्या अेका शुक्राणूत होतं त्यांच्या…आअीबाबांच्या …. अनेक पूर्वजांचं आनुवंशिक तत्व… आअीच्या बीजांडातही होतं तिच्या…. आअीबाबांच्या अनेक पूर्वजांचं आनुवंशिक तत्व… तो जिंकलेला शुक्राणू… ते मासिक पक्व बीजांड…. संयोग पावले ..आणि माझा गर्भपिंड अस्तित्वात आला […]

व्यर्थची यात्रा

जमले होते असंख्य भाविक, जगंदबेच्या दर्शना  । कांहीं तरी मागत होते,  हात जोडूनी चरणा  ।। दयावान ती आहे समजता,  गर्दी होते तिजपाशीं  । कधी न दिले काहींहीं तिजला,  मग ही मागणी कशी ?  ।। जावू नका दर्शनास तिच्या,  रिक्त अशा त्या हाताने  । तिला पाहिजे ताट पूजेचे,  भरलेले भक्ती भावाने  ।। व्यर्थ होवून जाती ते श्रम, […]

निघालास बाप्पा.. ठीक आहे..

निघालास बाप्पा.. ठीक आहे.. चल.. आवराआवर कर जाता जाता जमलंच तर मला थोडं लहान कर मागे वळून बघायचंय मला थोडं जगायचंय निसटलेल्या आनंदाला पुन्हा एकदा अनुभवायचंय फुलपाखरं पतंग भवरा गोट्या हेच तर सगळं विश्व होतं छोट्या गोष्टीत मोठ्ठा आनंद असं काहीसं चित्र होतं आता मोठ्या गोष्टी देखील छोटा पण आनंद देत नाहीत लाख जुळवून घ्यावं तरी […]

गणपती स्वप्नात माझ्या आला होता

काल रात्री गणपती स्वप्नात माझ्या आला होता सोंडेनेच डोळे पुसत गा-हाणे त्याचे सांगत होता गणेशचतुर्थीचा जणू धसकाच त्याने घेतला अनंतचतुर्दशीची वाट केव्हापासून पाहू लागला संयोजकांना हवी देणगीच्या नावे खंडणी चार आण्याचा गणपती बारा आण्याची मांडणी किडनॅप केल्यासारखे मला तोंड झाकून आणले कसे आणले, कुठे नेले काहीच नाही कळले भजन सेवेसाठी भजनी मंडळ आले ऐकायला ते अन […]

अशी अामची भक्ती देवा

अशी अामची भक्ती देवा प्रभादेवीला धाव शेंदूर फासलेल्याला महाग हार हाडामांसाच्या प्राण्यांना स्वस्तातले{?} घांव ! ||१|| अशी अामची भक्ती देवा लालबागच्या राजा , पाव ! बायको—पोरासाठी वेळ नाहि उंडारतोय सारा गांव ! ||२|| अशी अामची भक्ती देवा महालक्ष्मीला रांग खणा—नारळाची ओटी तिला गृहलक्ष्मीला मात्र टांग ! ||३|| अशी अामची भक्ती देवा तिरुपतीला टक्कल अाई—बाप गेल्यावर कशाला […]

अंबेस दाखवी काव्य

पाटीवरती अंक लिहीले,  बागडूं लागला आनंदाने पित्याचे लक्ष वेधण्या,  हनवटी खेची हातानें….१, प्रथमापासूनी लक्ष पित्याचे,  होते अवखळपणाकडे अजाणपणा दाखवोनी,  दुर्लक्ष करी मुलाकडे…२, शब्दांची गुंफन करूनी,  कवितेचा संग्रह केला तोच संग्रह घेवून चाललो,  दाखविण्या माहूरी रेणूकेला…३, जगदंबा ही आदी शक्ती,  सारे तिजला ज्ञात असते अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते…४, पाटीवरले अंक बघूनी,  हृदय पित्याचे […]

व. पु. ची अशीच एक भन्नाट कविता

माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं- घरादाराला कधीही ’लॉक’  नव्हतं.. तरीही माझ जीवन सुखाच होत ||१|| आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होत- स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत, पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होत- आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हत.. तरीही माझ जीवन सुखाच होत ||२|| घरासमोर छोटंसं अंगण होत- तुळस, प्राजक्ताला तिथे […]

पडछाया!

चालत असता संथ गतीने, एका वाटेवरती संगे माझ्या, माझी छाया,  मागून येत होती वेगामधली बघुनी तीव्रता, ती ही वाढावी वेग खंड न पडता साथ देणे, हेच तिचे अंग तळपत असता रवि आकाशी, जवळ ती आली समरस होण्या माझ्यामध्ये,  पायी घुटमळली ढळू लागला सूर्य हळू हळू, पश्चिम दिशेला प्रकाशातील तीव्रपणा तो कमी होऊ लागला पडू लागले पावूल माझे मंद मंद आता श्रमलो दमलो बसलो खाली, अंधार तो होता दूर दूर ती जावू लागली, छाया मजला सोडूनी […]

१० – वरद गणपती गुणद गणपती

वरद गणपती, गुणद गणपती, सुखद गणपती रे तव शुभ नामें बिकट पथा निष्कंटक करती रे   ।।   चिवट दाट भवतापकर्दमीं जीवनशकट रुते कुटिल भयप्रद संकट भेसुर विकटकास्य करते नतद्रष्ट विघ्नांचें सावट, विकटा, हटव पुरें   ।।   दुष्ट-कष्ट करतोस नष्ट तूं, हे मंगलमूर्ती दासांच्या आशांची अविरत तूं करसी पूर्ती क्लेशमुक्त होतात भक्तगण तव-गुण गाणारे   ।।   पापाचरणीं […]

1 342 343 344 345 346 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..