सर्व वेळ प्रभूसाठी
लक्ष आपले जात असते, सदैव प्रभूकडे, मार्ग सारे ठरलेले, जे मिळती तिकडे ।।१।। ‘को S हं’ शब्दाचा निनाद होतो, प्रथम मुखातून, जन्मताच तो प्रश्न विचारी, “मी आहे कोण?” ।।२।। मार्ग हा तर सुख दु:खाने, भरला आहे सारा, राग लोभ मोह अंहकार, याचा येथे पसारा ।।३।। वाटचाल करिता यातून, कठीण होवून जाते, जीवन सारे […]