नवीन लेखन...

आईच्या प्रेमाचा निरोप

आई तुझे प्रेम, अनंत त्याचे दाम । तुलनेसी ब्रम्हांडी, जड तुझीच पारडी ।।१।।   पुंडलीक तुझ्यासाठी, विसरला जगत् जेठी, कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ, शब्दांत नाही सामर्थ्य ।।२।।   बलीदानाची तू मूर्ती, ‘प्रेमाचे प्रतिक’ हीच तुझी कीर्ती, कष्ट करुनी वाढविले छोटे, विसरती तुला होऊन मोठे ।।३।।   सोडीनी एकटे तुजसी, पंख फुटता उडे आकाशी, निरोप देऊन प्रेमाचा, […]

दर्शनाची ओढ

पांडूरंगाचे दर्शन घेण्या,  गेला पंढरपूरी  । चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी  ।।   आजपरी शरीर दुबळे साथ देईना  । मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना  ।।   आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी  । भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी  ।।   आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे  । अंगणीत जमले भक्त गण […]

ज्ञान देणारे सर्वच गुरू

अवतीभोवती सारे तुझ्या, आहेत गुरू बसलेले, जाण तयांची येण्यासाठी, प्रभूसी मी विनविले  ।।१।।   निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी, काही तरी असे गुण, आपणासची ज्ञान असावे, घेण्यास ते समजून  ।।२।।   उघडे ठेवूनी डोळे तुम्ही, बघाल जेंव्हां शेजारी, काही ना काही ज्ञान मिळते, वस्तूच्या त्या गुणापरी  ।।३।।   सारे सजीव निर्जीव वस्तू, गुरू सारखे वाटावे, तेच आहेत […]

नाग नाग

नाग हा जमिनीखाली रहातो. गुप्त खजिन्यावर पहारा देतो. कुणी पुढे ठाकलं, तर फत्कारतो; कधी चावतोही. लोक त्याला भितात, त्याची पूजा करतात नागपंचमीला. हा नाग जमिनीवर रहातो. गुप्त खजिन्यावर पहारा देतो. कुणी पुढे ठाकलं, तर फूत्कारतो; कधी चावतोही. लोक त्याला भितात. त्याची पूजा करतात काल-आज-उद्या, कायमच. किमानपक्षीं, निवडणुकीनंतर पांच वर्षं तरी. — सुभाष स. नाईक. Subhash S. […]

स्वभाव मालिका

रक्तातुनी गुण-दोष उतरतो, वंश परंपरेने, व्यक्तीतील स्वभाव धर्म, जाणता येतो रक्ताने ।।१।।   मनांतील विचार मालिका, कृत्य करण्या लाविती, सभोवतालच्या परिस्थिती रूपे, रक्ताला जागविती ।।२।।   कर्म फळाच्या लहरींना, रक्त शोषून घेई, याच गुणमिश्रीत रक्तामधूनी, बीजे उत्पन्न होई ।।३।।   बीजांचे मग रोपण होऊनी, नव जीवन येते, स्वभाव गुणांची मालिका, अशीच पुढे जाते ।।४।।   डॉ. […]

बचाव

सरडा चढला झाडावरती, सर् सर् सर्, करीत  । लक्ष्य त्यांचे फूलपाखरू, फुलाभोवती होते खेळत ।।१।।   भक्ष्यकाची चाहूल मिळतां, भर् भर् भर् गेले उडूनी  । शोषीत असता गंध फुलांतील, चंचल होते नजर ठेवूनी ।।२।।   व्याघ्र मावशी मनी  , म्याँव म्याँव करीत आली  । उंदीर मामा दिसता तिजला, झेप घेण्या टपून बसली ।।३।।   शंका येता त्याला […]

आयुष्य लढा

चोखपणे हिशोब राहू दे, आपल्या जीवन कर्माचा, कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा ।।१।।   घीरट्या घालीत फिरत राही, आवतीभवती काळ, क्षणात टिपून उचलून घेतो, साधूनी घेता अवचित वेळ ।।२।।   सदैव तुमच्या देहाभवती, त्या देहाचे कर्मही फिरते, आत्मा जाता शरीरही जाई, कर्मवलय परि येथेच घुमते ।।३।।   पडसाद उमटती त्या कर्माचे, सभोवतालच्या वातावरणी, […]

स्मृतिकाव्य : तूं अजुन-जगीं-असण्याचा दिनरात भास होतो

संभ्रम तुझ्या हंसण्याचा नित काळजास होतो तूं अजुन-जगीं-असण्याचा दिनरात भास होतो ।। १ हलकीशी झुळूक गंधित अंगावरून जाई कुठुनी हा सोनचाफा उधळत सुगंध राही ? स्मृतिचा, मनात माझ्या अविरत सुवास होतो ।। २ मज कोण बोलवी हें , कां नेत्र ओलवी हे ? कंठात हुंदका कां दाटुन उगीच राहे ? संसर्ग विकलतेचा, आहत-मनास होतो ।। ३ […]

मशाल

श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर  । विविध नामे परि,  दुर्बलांची करण्या कामे  ।१। अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी  । दैवी शक्ती अंगी,  अंधारी चमकली ठिणगी  ।२। मशाल घेवून हाती,  आला धावत पुढती  । अति वेगाने, सर्वांची उजळीत मने  ।३। कर्म योग आणि भक्ती,  ह्या तीन ईश्वरी शक्ती  । एकत्र जाहल्या,  मशालीत त्या समावल्या  […]

समाधानाची बिजे

दाही दिशांनी फिरत होतो मनी बाळगुनी तळमळ ती कसे मिळेल समाधान ते विवंचना ही एकच होती   धन दौलत ही हातीं असतां धुंडाळल्या त्या बाजार पेठा न मिळे समाधीन कोठें थकली पाऊले चालून वाटा   देखिले निसर्गरम्य शिखरे आणिक कांहीं प्रार्थना स्थळे शिलकीमध्यें दिसे निराशा कारण त्याचे कांहीं न कळे   भावनेमधली विविध अंगे येऊं लागली […]

1 352 353 354 355 356 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..