व्योमातुन अवतरला गजमुख
अंतराळ-यायित्राकासारखा धारुन गणवेश व्योमातुन अवतरला गजमुख, देव-गणाधीश ।। १ सोंडेसम भासतो मुखवटा, ‘प्राणवायु’ पुरवी संरक्षक अवकाश-कवच त्या तुंदिलतनु बनवी ध्वनिसंवर्धक मुखाजवळ, जणुं हस्तिदंत एक शूर्पकर्णसम बशीमधे केंद्रित ध्वनि प्रत्येक अश्वहीन रथ मूषक भासे, पुच्छ धूम्ररेष ।। व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। २ प्रकाशगतिनें कुठून आला लक्ष-लोक लांघुनी भूवर कधि, कितिदा अवतरला, नच जाणे कोणी कोटिकोटि मानव-जन्मांच्या […]
