नवीन लेखन...

लेक माझी

अशी कशी लेक देवा, माझ्या पोटी येते नाव सुद्धा माझं ती इथेच ठेऊन जाते।। पहिला घास देवा ती माझ्या कडून खाते माझाच हात धरुन ती पहिलं पाऊल टाकते।। माझ्याकडूनच ती पहिलं अक्षर शिकते तिच्यासाठी सुद्धा मी रात्र रात्र जागतो।। कुशीत माझ्या झोपण्यासाठी गाल फुगवुन बसते…. मी आणलेला फ्रॉक घालून घर भर नाचते।। अशी कशी लेक देवा, […]

सत्कारणी वेळ

करू नकोस विचार त्याचा, करणे नाही जेंव्हां तुजला मोलाचे हे जीवन असता, व्यर्थ दवडशी वेळ कशाला….१   दोन घडीचे जीवन सारे, क्षणा क्षणाने जाईल निघूनी कुणासाठी हा काळ थांबला, उत्तर याचे घे तू शोधूनी….२   लहरी उठतील विचारांच्या, आघात होता जेंव्हां मनी विवेक बुद्धीने शांत करावी, भाव तरंगे त्याच क्षणी….३   मर्यादेचे आयुष्य असता, वाहू नकोस […]

फ्लॅटचे ध्येय (१९९५ साल)

त्याच्या आणि माझ्या जीवनांत खूप तफावत होती. तो कसा जगतो ?  – – – ह्याची मलाच काळजी होती. बिनधास्त, बेफिकीर, मनमानी त्याचे जीवन खाओ, पिओ, और मौज करो, हे त्याचे समिकरण. अनअधिकृत झोपडपट्या मधल्या दोन झोपड्या शेजारी मागील वर्षीच अधीकृत होऊन नोंद झाली सरकारी. तूर्तास तरी पाडून टाकण्याची भिती गेली ह्यामुळे छताची तरी सोय झाली. आम्ही […]

खेचून मिळवा

तो तर देत नसतो कांहीं, घ्यावे लागते खेचूनी  । शक्ती लावूनी खेचा सारे, देईल परि ढील सोडूनी  ।।१।। जरी असला दयेचा सागर, केवळ मागणें मान्य नसे  । तुटून तुमचे प्रयत्न होता, ओजळीने तो देत दिसे  ।।२।। व्यर्थ घालवी जीवन कांही, स्वार्थीपणाच्या मागणी पायी  । वेडे ठराल तुम्हींच परि, काळ मात्र कधी थांबत नाही  ।।३।। धडपड करा, […]

चुकीचे मूल्यमापन

चार कविता सुंदर रचिल्या, काव्य वाचन केले त्याचे रसिक जनाची स्तुति ऐकूनी, स्वप्न रंगविले कालीदासाचे….१,   कॉलेजातील रंगमंचावरी, तल्लीन होवूनी भूमिका केली टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली….२,   जमले होते शंभर श्रोते, भाषण ज्यांचे समोर केले श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी, गांधी नेहरूसम होवूं वाटले…३,   यश जेंव्हां पदरी पडते, भारावूनी जातो आम्ही त्यावेळी कर्तृत्व […]

माझे पणाची जाणीव

एका मोठ्या कारखान्याचा मालक, भासत होता छोट्या विश्वाचा चालक लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती, मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन, लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती, खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे पण नशीब दुर्दैवी बिचारे, मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला, वर्ज्य […]

वडिलांचा आशिर्वाद

नव्हतो कधींही कवि वा लेखक कसे घडले कांहीं न कळले साहित्य सेवेचा गुण मिळूनी काव्य मजला सूचू लागले    १   वाङ्‍मयाविषयी प्रेम होते वडीलांना त्या काळी अथांग ज्ञान त्यांनी मिळविले पुस्तके वाचूनी सगळी   २   खो – खो मधल्या खेळा सारिखे खो देत ते गेले बसूनी साहित्याची ठेव सोपवूनी मज ते गेले चटकन निघूनी   ३   […]

व्यसनासक्ति विषयी !

दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द ! लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद ।।१।। अजगराच्या विळख्याहूनी, महाभयंकर सत्य एक नव्हे, अनेक सारे, नष्ट होतील त्यांत ।।२।। होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी ।।३।। जाणूनी घ्या त्या शत्रुला, छुपा रुस्तूम तो प्रवेश एकदा शरिरीं मिळतां, कायमचा तो […]

निती मूल्ये विसरला

विसरलास तू मानव पुत्रा, नीतिमूल्ये सगळी, काय दुर्दशा झाली तुझी, काय दुर्दशा झाली….।। धृ ।। स्वप्नामध्ये दिले वचन, पाळीले ते राज्य घालवून, हरिश्चद्रांची कथा आजही करीते मान ताठ आपुली….१, विसरला तू मानव पुत्रा  नीतिमूल्ये सगळी, राजा साठी देई प्राण, दुजासाठी होते जीवन, ‘सिंहगड’ तो घेई जिंकूनी शिवरायाची शान राखली….२, विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी, काळ […]

विपरीत आनंद

खोड्या करणे, त्रास देणे, हाच बनला स्वभाव त्याचा वाटत होते बघून त्याला, दूरोपयोग करि तो शक्तीचा…१ पाय ओढणे, खाली पाडणे, कपड्यावरी तो चिखल फेकणे मारपिट ती करूनी केंव्हां, गुंडपणा तो करित राहणे…२, बेफिकीर ती वृत्ती तयाची, स्वार्थाने तो भरला पुरता तुच्छ लेखी इतर जनाना, स्व आनंद साधत असतां….३, ‘आनंद’ मिळवणे हेच ध्येय, जीवनाचे तत्त्व खरे ते […]

1 357 358 359 360 361 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..