तुझ्याविणा (स्मृतिकाव्य)
जीवन हें वैराण तुझ्याविणा ; जीवन एक स्मशान तुझ्याविणा. निरर्थ आयुष्यच तुझ्याविणा ; अश्रूंचा खच फारच तुझ्याविणा. आयुष्यप्रवाह सुके तुझ्याविणा ; हें जग वाटे परकें तुझ्याविणा. मनिं दु:ख नित्य ताजें तुझ्याविणा श्वासांचेंही ओझें तुझ्याविणा. मी थकलो चालुन फार तुझ्याविणा ; साहवे न जीवनभार तुझ्याविणा. चालतां, रात्र आली तुझ्याविणा ; एकटा, पडे खाली तुझ्याविणा. – – – […]
