चक्रव्यूह
ठोका खोकी बनवा खोपी ही झोपडपट्टी गटारावरी भटारखाना आणि हातभट्टी. ||१|| ओसंडे घन दुर्गंधि-घाण कचरा सडला तिथेच भ्रामक जीवन नामक खेळ मांडला. ||२|| रोज ठणाणा नविन घोषणा सुधारणांच्या. शून्यें असतीं नांवावरती सरकारांच्या. ||३|| मंत्री येतां जिवंत प्रेतां बघुन न बघती गोठ्यामधली ढोरें सगळी तशीच ज़गती. ||४|| चक्रव्यूह रणिं रचला कोणी मुळी न ठाउक […]
