नवीन लेखन...

म्हणूं नका

लक्षच लागेना कृतीत, करतोहे म्हणुन चुका ! मनस्थिती जाणा, ‘कामातुन गेला’ म्हणूं नका ।। खिन्नपणा असुनही स्मिताचा यत्न स्तुत्य नच कां ? राखा रे सन्मान ज़रा, ‘रडवेला’ म्हणूं नका ।। नयनांचा ओलसर असे पडदा, तो नुरे सुका तरि या विरहार्ता, ‘डोळे भरलेला’ म्हणूं नका ।। अश्रूंचा पाझर हलकासा, दिसत नसे इतुका पण, हळव्याला, ‘धीर मनी धरलेला’ […]

जादूगार तूं देवा ।

जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   ।।धृ।। ढग काळे काळे जमवितोस सगळे गर्जती वादळे कडाडूनी विजा,  पर्जन्य होई भयंकर   ।।१।। जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार तळपते ऊन दग्ध होई जीवन जाई वाळून तेज वाढूनी सूर्याचे,  दाह करी फार   ।।२।। जादूगार तूं देवा,  दाखवी […]

ऊन कधी कलतं झालं

बघतां बघतां ऊन कधी कलतं झालं तें मला समजलंच नाहीं, उमगलंच नाहीं. इवलं होतो मुक्त पाखरूं वारा पिऊन बागडणारं क्षणात रुसणारं-फुगणारं क्षणामधें खुदकन् हंसणारं. होतं हंसू निर्व्याज मोकळं होतं सकाळचं ऊन कोवळं. हळूंच सारं पसार झालं किलबिलतांना कळलंच नाहीं. अचानक येऊन यौवनानं ‘टक्-टक्’ करून केलं जागं आणि उंबरठा ओलांडून मस्तीत राहिलं पुढे उभं. मी स्वार होतांक्षणीं […]

अनुभव

सुख दुःखाच्या लाटेमध्ये, तरणे वा बुडणे, जगेल तो त्या क्षणी, ज्याला माहित पोहणे ।।१।। पोहणे जगणे कला असूनी, अनुभव हा शिकवूनी जातो, जागरुकतेने कसे जगता, यशही त्याला तसेच देतो ।।२।। जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या, कष्ट लागती महान, परि केवळ एक अनुभवी प्रसंग, सारे देतो मिळवून ।।३।। अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे, निसर्ग शिकवी क्षणोक्षणी, सतर्कतेने वेचून घ्यावे, दैनंदिनीच्या […]

झगडणारे जीवन

गर्भामधूनी बाहेर पडतां, स्वतंत्र जीवन मिळे  । जीवन रस हा शोषित होती, आजवरी त्याची मुळे  ।।१।।   निघून गेला पदर मायेचा, डोईवरूनी त्याचा  । झेप घेयी तो आज एकला, पोकळीत नभाच्या  ।।२।। दु:ख क्लेशाचे वार झेलले, कुणीतरी त्याचेसाठीं  । आज दुवा नसता सारे पडती पाठी  ।।३।। तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे  । वंशाने […]

स्मृति

जीवनाचा प्रवाह हा भरला आहे घटनांनीं विसरुनी जातो  काहीं काहीं राहती आठवणी  ।।१।। बिजे ज्यांची खोलवर रुतुनी जाई त्या घटना देह आणि मनावर बिंबवूनी जाई भावना  ।।२।। काळाचा असे  महिमा आच्छादन टाकी त्यावरती परि काहीं काळासाठी विसरुनी जातात स्मृति  ।।३।। प्रसंगी त्या अवचित जागृत होती आठवणी पुनरपि यत्न होतो जाण्यासाठीं त्या  विसरुनी  ।।४।। — डॉ. भगवान […]

चारोळी – लग्न

लग्न म्हणजे प्रारंभात, प्रेम आणि श्रृंगार, लग्न म्हणजे पूर्वार्धात, तडजोड आणि संसार, मध्यंतरात तर लग्न म्हणजे, वाद-वैताग-अंधार, पण लग्न म्हणजे उत्तरार्धात, सोबत आणि गंधार | — सौ. अलका वढावकर

कामवाली

नाही कशी म्हणू, पगार जास्त देते थांब, परी माझे काम सोडून जाऊ नको लांब.. ! नाही कशी म्हणू तुला, तुझा काढते वीमा, फंड पण विरोधात नको माझ्या पुकारुस बंड.. ! नाही कशी म्हणू तुला, T.V. पहा दूपारी, परी आधी माझे काम आणि, मग जा शेजारी.. ! नाही कशी म्हणू तुला, वर्षाकाठी साडी, परी सोसायटीमधल्या मला, सांग […]

काळ व कार्याची सांगड

मानव जीवन तुम्हां लाभले, महत् भाग्य ते समजावे कर्म दिधले पाठी तुमच्या, सद्उपयोगी यांसी करावे….१, जीवन रेखा मर्यादेतच, ठेवली असती तुमचे हातीं जाणीव त्याची मनीं असावी, कर्म कार्ये जेव्हां करिती…२, हाती घेतल्या कार्यामध्ये, एकचित्त तो प्रयत्न व्हावा काळ केवढा तुमचे जवळी, याचा विचार सतत यावा…३, कार्ये राहता अपूर्ण अशी, वेळ न उरे तुमचे हाती अभाव असता […]

चि. मानसीस (दीड वर्षाच्या नातीस)

थांबव मानसी, चक्र वाढीचे, कळ्यातूनी तू फुलतांना, हासत खेळत तुरु तुरु चालणे, शिशू म्हणूनी जगतांना ।।१।। कौतुकाने ऐकतो तुज, शब्द बोबडे बोलतांना, हरखूनी जातो चाल बघूनी, हलके पाऊल पडतांना ।।२।। आनंद पसरे सभोवताली, इवल्या त्या प्रयत्नांनी, बदलूनी जाईल क्षणात सारे, रुळलेल्या तव हालचालींनी ।।३।। तुझ्यासाठी जे नवीन होते, प्रयत्न तुझा शिकून घेणे, अपूर्णतेची आमुची गोडी, लोप […]

1 362 363 364 365 366 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..