सिकंदरची शांतता
दिग्वीजयाच्या स्वारीवरती, निघे सिकंदर सैन्य घेवूनी जग जिंकण्या ध्येय मनाशीं, महान आशा उरी बाळगूनी आश्वा रुढ ते सैनिक सारे, सिकंदराच्या मागें धावती लगाम खेचूनी वृक्षा पाशीं, एक साधू तो बघूनी थांवती पृच्छां करितां साधू म्हणाला, शांत चित्त तो बसला असे मिळविण्यास ते कांहीं नसतां, शोध प्रभूचा घेत दिसे सिकंदर वदे देश जिंकूनी, संपत्ती घेई लुटून सारी […]
