नवीन लेखन...

आनंद घट

देहमनाचा आनंद औरची, नसे तयाला दुजी कल्पना  । जीवनामधले मिळता सारे, न तेथे कसली तुलना  ।।१।।   आनंदाचा घट भरूनी हा, तन मन देयी पिण्यासाठी  । आनंदाला नसे सीमा मग, अनेक घट अन् अनेक पाठी  ।।२।।   एक घटातूनी आनंद मिळता, दुजे घट हे जाती विसरूनी  । अनेक घटांतील आनंद हा, लुटाल कसा तृप्त होवूनी  ।।३।। […]

खरे ग्रह

तुमचे जीवन अवलंबूनी, ग्रहराशीच्या दशेवरती तेच होई जीवनी तुमच्या, जसे ग्रहमंडळ फिरती…१,   मित्र मंडळी सगे सोयरे, शत्रू असोत वा प्रेमाचे, जीवनातल्या हालचालीवरी, परिणाम ते होई सर्वांचे…२,   हेच सर्व ते ग्रह असूनी, सतत स्थान ते बदलती परिस्थिती बघूनी तुमची, वागण्यात तो फरक करती…३   अपयशाला कारणीभूत तो, असतो कुणीतरी नजीकचा राहू-केतू शनि वा मंगळ, ग्रहमान […]

मीरेची तल्लीनता

नाच नाचती तालावरती मीरेची पाऊले चित्त ते हरीमय जाहले. – – – धृ   लागला प्रभुचा ध्यास हरि दिसे नयनास चलबिचल नजर होऊन अंग सारे मोहरले   – – -१ चित्त ते हरीमय जाहाले   न राही आपले भान झाली भजनी तल्लीन तनमन प्रभुचे ठायी जाता संसार ते विसरले. – – – २ चित्त ते हरीमय जाहाले […]

बाबांच्या रुपांत, तुम्ही आहांत काका

शंभर वर्षे जगा तुम्हीं, काका आमच्यासाठीं, बाबांच्या रुपांत रहा, तुम्ही सर्वांच्या पाठीं ।।१।।   भाऊ तुम्हीं त्यांचे असूनी, रुप लाभले बाबांचे, तुम्हास बघतां दिवस आठवती, त्यांच्या सहवासाचे ।।२।।   उशीर झाला होता, जेंव्हा जीवन उमगले, कुणा दाखवूं वाट यशाची, बांबानी तर डोळे मिटले ।।३।।   आंबा गेला मोहरुनी, लाविली होती त्यांनी झाडे, दुर्दैवाने आमुच्या, नाही ते […]

मिठापरी जीवन

खारेपणा हा अंगी असतां, कोण खाईल केवळ मीठ, परि पदार्थाला चव येई, मिसळत असता तेच नीट ।।१।।   जीवन सारे खडतर ते, भासते मिठासम मजला, केवळ जीवन बघता तुम्हीं, पेलणें अवघड सर्वाला ।।२।।   तेच जीवन सुसह्य होई, ‘आनंदात’ जेंव्हां मिसळते, हर घडीच्या प्रसंगामध्ये, समाधानाचे अंकूर फुटते ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com […]

गुणधर्म

करूं म्हटले करूं न शकलो रोकू म्हटले रोकू न शकलो जे जे स्फूरले येईल ते ते ठरले असते होईल ते ते   बघूनी बाह्य जगला ठरवी मिळवीन तेच सुख भावी त्याचेसाठी स्थिती आगळी उमज न येई ती सगळी   धडपड करीतो गडबड करीतो त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो सुप्त गुण हे अंगी लपले उभारून ते येतील सगळे   […]

जग

मी म्हणालो जगाला मला फक्त तुझ्यासाठी आणि स्वतःसाठी जगायचयं… जग म्हणालं मला माझ्यासाठी जगं पण टाळं स्वतःसाठी जगायचं… मी बदललो जगाच्या कल्याणासाठी पण आता जगचं मला बदलतयं… जगात बदल घडवणं आता अशक्य आहे कारण जग आता पाषाण झालयं… © कवी – निलेश बामणे ( एन.डी.) दिनांक – 9 मार्च 2016

लग्न म्हणजे काय असतं ?

लग्न म्हणजे काय असतं ? एक चुकलेलं गणित असतं कारण तिथे एक आणि एक तीन असतं… लग्न म्हणजे काय असतं ? उगाच त्याग करणं असतं कारण त्यातून काहीतरी मिळवायचं असतं लग्न म्हणजे काय असतं ? दोन जीवांचं मिलन असतं कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं लग्न म्हणजे काय असतं ? मोक्षाकडे नेणारं दार असतं कारण […]

जगणें अटळ असतां

वाट कुणाची बघतो आम्हीं, ठाऊक असते सर्वांना, मृत्यू हा अटळ असूनी, केव्हांही येई अवचित क्षणा ।।१।।   आगमनाचा काळ त्याचा, कल्पनेनें ठरविला जातो, अचूक जरी शक्य नसले, विचार त्यावरी करीता येतो ।।२।।   जीवन म्हणती त्या काळाला, जगणे आले मृत्यू येई तो, जगण्यापुढे पर्याय नसतां, सुसह्य करण्या प्रयत्न होतो ।।३।।   तन मनाला सुख देऊनी, जीवन […]

1 365 366 367 368 369 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..