नवीन लेखन...

पंढरीचा राणा – ५ : अविरत भक्त करत वारी

अविरत भक्त करत वारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् अथक जन ज़ात विठूदारीं, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।। ऊन नि पाउस यांची नाहीं एकाला पर्वा ध्यास एकची लागे सर्वां – तो विठ्ठल बरवा भारले सारे वारकरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।। कठिण शेकडो मैल तुडवती मराठदेशातले अखंड नाचत भक्त शेकडो, कुणिही नच दमले देइ चैतन्य मनां पंढरी, […]

काव्य कलश

ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा, उपसतो जरी सतत, होत नसे निचरा….१, गोड पाणी शब्दांचे, ओठी अमृत वाटे, पेला भरता काठोकाठ, काव्य हृदयी उमटे….२, पेला पेला जमवूनी, कलश भरून आला, नाहून जाता त्यात, देह भान विसरला….३, सांडता पाणी वाहे, पसरते चोहीकडे, आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे….४ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

पंढरीचा राणा – ४ : चला रे जाऊं पंढरिला

ज्ञानदेव : चला रे जाऊं पंढरिला तिथें कधीचा अपुल्याकरितां श्रीहरि खोळंबला ।। ज्ञाना ज़रि हठयोगी आहे परी हृदय श्रीहरीस पाहे योगेश्वर आनंदसिंधु तो, हें ठावें मज़ला ।। कुणी तया म्हणती श्रीरंग कुणि विठ्ठल, कुणि पांडूरंग स्वयम् द्वारकानाथ आपुल्या पंढरीस आला ।। मुगुट विराजे तोच शिरावर मंद-हास्यही तेंच मुखावर तीच रुळे वक्षावर मोहक वैजयंतिमाला ।। पुंडलिकाचें निमित्त […]

सुख दु:खाचे चक्र

सतत फिरे चक्र निसर्गाचे सुख दु:खाचे…१, एका मागूनी दुसरा असती पाठोपाठ येती…२, प्रत्येक वस्तूची छाया असते पाठलाग करीते….३, सुखाचे जाता काही क्षण आनंदी समाधानाची होई गर्दी….४ लगेच अनुभव येतो दु:खाचा काळ जाई निराशेचा…५, पुनरपी येता सारे सुख विसरूनी जातो दु:ख….६, जे होत असते ते बऱ्यासाठी म्हणती समाधाना पोटी…७, समाधान शोधणे हेही सुख त्यातच  जगती अनेक…८   […]

हा दुरावा साहवेना (स्मृतिकाव्य)

हा दुरावा साहवेना, संपवी क्षणभर स्वयें एकदा स्वप्नांत तरि ये, एकदा तरि ज़वळ ये ।। कां अशी गेलीस सखये प्रेमबंधन तोडुनी ? कां अशी गेलीस सखये एकला मज सोडुनी ? सात-जन्मीं-साथिचें तें वचन मजला आठवे ।। काय झालें सांग, मजवर एकदम रुसलिस अशी काय आलें सांग, जगतां त्यागुनी गेलिस कशी ? जन्मभरचे पाश तुटणें , चांगलें […]

पंढरीचा राणा – ३ : निघे दिंडी पंढरपुरला

भेटायाला भीमातीरीं उभ्या विठ्ठलाला निघे दिंडी पंढरपुरला ।। ज्ञानदेव, मुक्ता, निवृत्ती नामदेव, सोपान संगती सवें तयांच्या, जनी सावता अन् चोखामेळा ।। भान हरपुनी वारी नाचे नाम मुखीं पांडूरंगाचें टाळमृदुंगांसंगें वाजत एकतारि-चिपळ्या ।। नेत्रांपुढती रूप मनोहर उभें कटीवर ठेवुनिया कर गळ्यात खुलते हंलती-डुलती तुलसीची माला ।। जीवन झालें पांडुरंगमय नुरलें माया-मोह नि भव-भय भक्तीतुन मुक्तीप्राप्तीचा पथ हा […]

सर्वांची काळजी

मुसळधार वर्षा चालली, एक सप्ताह  होऊन गेला, पडझड दिसली चोहीकडे, भरुन वाहे नदी-नाला ।।१।।   काय प्रयोजन अतिवृष्टीचे ? हानीच दिसली ज्यांत खरी, निसर्गाच्या लहरीपणानें, चिंतीत झाली अनेक बिचारी ।।२।।   दूरदृष्टी माझी मर्यादेतच, विचार तिजला अल्प घटकांचा, विश्वचालक काळजी करि, साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

पंढरीचा राणा – २ – ‘पांडुरंग पांडुरंग’ ध्वनि निनादला

‘पांडुरंग पांडुरंगऽ’ ध्वनि निनादला नामपावसात मेळा चिंब जाहला ।। ‘पांडुरंग’, तुणतुणें भजनात गुणगुणे ‘पांडुरंग’, झांज आणिक टाळ खणखणे ‘पांडुरंग’-तालावरती वाजत चिपळ्या ।। ‘पांडुरंग पांडुरंगऽ’ गाइ एकतारी ‘पांडुरंग’, ढोलकीची कडकडे तयारी ‘पांडुरंग’, दुमदुमता-मृदंग बोलला ।। ‘पांडुरंग पांडुरंगऽ’, पाय थिरकती टाळ्यांतुन शतहातांची वाढते गती धुंदित भगवा पताका-संच डोलला ।। ‘पांडुरंग पांड़ुरंगऽ’, घोष भूवरी ‘पांडुरंग पांडुरंगऽ’, मेघ अंबरीं ‘पांडुरंगगान’ […]

स्वप्न मजला आवडते

ये ! प्रियकरा स्वप्नात माझ्या, स्वप्न मजला आवडते भावते कल्पनेचे राज्य जरी, आनंददायी वाटते….II धृ II तव प्रतिमा मनी बसवली, आठवण सदैव येऊ लागली  । जागेपणी मिळे न मजला, स्वप्नी सारे तेच अनुभवते…….१ स्वप्न मजला आवडते , पूर्णत्वाचे सुख आगळे, जीवन प्रवाही येती अडथळे  । हवे हवेसे मनी ठरवी ते, केवळ स्वप्नची मिळवूनी देते….२ स्वप्न मजला आवडते , कल्पना, भाव- […]

पंढरीचा राणा – १ : चालली वारी पंढरिला

नामगजर दुमदुमतो, नाचे भक्तांचा मेळा चालली वारी पंढरिला ।। लहानथोर इथें ना कोणी लीन सर्व पांडुरंगचरणीं जगता विसरुन , ज़ात भक्तजन विठ्ठलभेटीला ।। करि बेभान भजन प्रत्येका देहीं उत्कट विठ्ठलठेका कंठाकंठातील घोष शतगुणित करी ताला ।। मुदित मनांचा अलोट साठा हर्षाच्या लाटांवर लाटा अंत नसे आनंदमग्न-हरिभक्तसागराला ।। वाज़त चिपळ्या, डुलत पताका नाचत दिंड्या, तृण, तरुशाखा भंवती […]

1 358 359 360 361 362 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..