अर्जून दुर्योधन कृष्णाकडे

दोघेही येती एकाच वेळीं  श्रीकृष्णाच्या भेटीला,
अर्जून उभा चरणाजवळी  दुर्योधन बसे उशाला ।।१।।

 

प्रथम दर्शनी नेत्र उघडता  नजर गेली अर्जूनावरी,
प्रभूकडे तो आला होता  आशीर्वाद त्याचे घेण्यापरी ।।२।।

 

दुर्योधन दिसे बघता पाठी  अहंकाराने होता भरला,
मदत करण्या युद्धासाठी  विनंती करी तो हरिला ।।३।।

 

युद्धामध्ये भाग न घेई  सांगेन गोष्टी उपदेशाच्या,
परि सारे त्याचे सैन्य जाई  लढण्या दुसऱ्या बाजूच्या ।।४।।

 

विश्वास होता सैन्यावरी  दुर्योधन मागतो अनेक,
आशीर्वाद हवा होता  अर्जून निवडतो एक ।।५।।

 

निवड करूनी श्रीकृष्णाची  विश्वास येई स्वत:वरी,
अस्तित्व शक्ती जेथे प्रभूची  जयश्री जाईल कशी दुरी ।।६।।

 

डॉ. भगवान नागापूरकर 
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1724 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…