नवीन लेखन...

प्रकाश

लावूया उजेडाचे रोप पिकवुया सूर्यप्रकाश अणु, रेणु उजळेल सर्वत्र प्रकाश प्रकाश सरेल अंधार, अंधार सत्यप्रभा किरणांची प्रकाशझोत आत्मरंगी साक्ष निर्मळ जीवनाची रोपटे, प्रसन्न उजेडाचे साक्षात्कार चैतन्याचा सुखावती श्वास निरंतर हाच दृष्टांत दयाघनाचा लावावी ज्योत विवेकी उजळावा, मनप्रकाश वात्सल्यप्रीत जागवावी मनी उमलुदे भावप्रकाश — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२६० १४/१०/२२

कालचक्र

तुझ्या विरहात जगताना वाटते सर्वस्व हरवुनी गेले खंत उरिची उदास करिते तुझ्याशी बोलणे राहुनी गेले… उमजुनही अव्यक्त राहिलो मन गुंतुनीही व्याकुळ झाले तुझ्याच लडिवाळ लोचनात विरघळणेच राहुनीया गेले… स्मरणात निर्मळी भावस्पर्श क्षण तो विसरणे राहुनी गेले क्षण कधीच नाही थांबले कालचक्रात ते वाहुनी गेले… कल्लोळ, सांजभावनांचा शब्दात सांगणे राहुनी गेले आळवुनही प्रीतभावनांना तुझ्याशी बोलणे राहुनी गेले… […]

शब्द निःशब्द

भावशब्द कां? निःशब्द अव्यक्त कां? मनभावनां शब्दाविना कसे उमगावे सत्यार्थ अनंताचे सांगना… तव दर्शना आसक्त अंतरंग मनास, शांतवु कसे सांगना नाव तुझेच नित्य वैखरीवरी मौनात उच्चारु कसे सांगना… तव भक्तीरंगात मी दंगलेला दयाळा आळवु कसे सांगना शब्द, स्वर, सूर घुटमळलेले तुझ्याच नामस्मरणी गुंतताना… घुमते, मधुरम हरिची पावरी देवा तुला शोधू कुठे सांगना लोचनात, कैवल्य रूप तुझे […]

मृत्युंजय

अज्ञात दिवा मी मिणमिणणारा संकटाचे येऊ देत वादळी वारे वावटळही ती येऊ दे आणि अंगावर येऊ देत सारे पण मी विझणार नाही मी जागृत रहाणार आहे पेटूनऽ…. पेटून, पेटवून मी प्रज्वलित होणार आहे जरी मला ज्ञात आहे गेल्यावर मी, फक्त…. दप्तरी नोंद होणार आहे विस्मृती मला घेरणार आहे पण कर्तव्य माझे मी पार पाडणार आहे जन्म-जीवन […]

भाग्य

भाळीचे भाग्य असावे मृदुलस्पर्शी स्वर्गसुखाचे अमृत प्रीतवात्सल्याचे सौभाग्य सहृदी मित्रत्वाचे…. आयुष्याच्या वाटेवरती दुःखातही सुखावणारे आधाराचे हात देवूनी कुणी असावे सावरणारे…. रमविणाऱ्या रम्यनिसर्गी ऋतुरंगात भुलूनी जाता मोहरल्या मिठित विरूनी दिव्यस्पर्शात मिटुनी जावे…. जन्म, मृत्यु सत्यशाश्वती हॄदयांतरी जपता भावप्रीती सांजाळल्या क्षितिजावरती जीवा लाभावी आत्मशांती…. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २५६ १२/१०/२०२

सत्य दृष्टांत

कुठुनशी येते नित्य कविता मलाच माझे कळतच नाही झुळझुळते वास्तव शब्दांचे कसे ते मजला कळत नाही निर्बंधी मी क्षण टिपतो सारे मनशब्दां बांध घालित नाही सत्य दृष्टांता स्वछंदी गुंफितो इमले कल्पनांचे रचित नाही भावनांच्या त्या शब्दफुलांवर मी अन्याय कधी करीत नाही शब्दशब्द, दानच दयाघनाचे मी अलगद वेचणे सोडित नाही शब्दभावनांच्या अथांग सागरी मी डूंबायाचे कधी सोडित […]

नैराश्य

मी निराश झालो आहे ।। खाचखळग्यांतून, दगडधोंड्यातून पराभवाच्या अपमानातून शल्य मनातले मनातच ठेवून त्यातून वाट शोधत आहे ॥ मी निराश झालो आहे ॥ १ ॥ आत्मविश्वास तो गडबडे ताबा अन् मनावरचा उडे येथेच अडकून घोडे पडे दुःख चावरे त्याचे मला आहे ॥ मी निराश झालो आहे ॥ २ ॥ प्रवास माझा पहाटे धवल यशाच्या धुक्याचे पटल […]

सार्थक

जगती जन्म हा हिशेब गतजन्मांचा प्रारब्धभोग पुर्वसंचिताचे….. कधी सुखदा, कधी दुःख वेदनां हेच खेळ सारे मूक साहण्याचे…. पराधीनता जगती सकल जीवाजीवांची अनामिका हाती दोर कठपुतळीचे….. दैवी प्रीतभावनां भाग्य ते भाळीचे वात्सल्य अमृती कृपासिंधु मातेचे…. तोच कृपाळू एक सत्य ! शाश्वताचे त्याला नित्य स्मरावे हे सार्थक जीवनाचे…. –वि.ग.सातपुते.( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१९० ६/८/२०२२

सांजवात

लोचनी सांजवात आठवांची झाली व्याकुळ कावरी बावरी… तव निर्मली रूपात मी हरवलो सांगना कसा परतु मी माघारी… तुच लाविलास जीवास जीव ओथंबुनी, ओघळतेस अंतरी… आत्म्यास जाणवतो स्पर्श तुझा हे सत्य मौनी कवटाळीतो उरि… हुरहुर ती, हरएक क्षण सोबती जगविते लोभस संध्याकिनारी… होता नि:शब्द , वादळ अंतरीचे मग हॄदयी, घुमते हरिची बासुरी… — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना […]

भिज नां पाऊसात

भिज नां जराशी नखशिखांत मना नाहूदे चिंबचिंब पाऊसात… हा ऋतुच बहरलेल्या प्रीतीचा ओलेती ये भावनांच्या मिठित… निर्मळ स्पर्शात चैतन्य आगळे ब्रह्मानंदाची, साक्ष त्या सुखात… निसर्गाचे, अविष्कार पांघरावे भिजुनी रिमझिमल्या सरिसरित… ही कोजागिरी, चंद्र चांदण्यांची कोजागर, कोजागर मनांमनात… — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २५३ ९/१०/२०२२

1 27 28 29 30 31 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..