नवीन लेखन...

सोबत

सख्या, तुझ्या आठवात मी, चालते संथ पाऊली सांजवर्खी या सांजवेळी ओघळले, काजळ गाली सोबती तीच वाट निरंतर तुझ्याच स्पर्शात नाहलेली पापण्यातील अस्तिव तुझे खुलवीते या गालीची खळी ही नित्याची साक्ष अंतरी उमलते पाकळी पाकळी अनवट मोहक वाटेवरचा तूच नटखट माझ्या भाळी तुज मी स्मरता वेळोवेळी लोचनी प्रीत गहिवरलेली तुझा असा असह्य दुरावा सर्वत्र तुझी स्मृती रंगलेली […]

अबोला

मज अजुन नाही कळले मी तुझ्यात कसा गुंतलो ज्या क्षणी तुज पाहिले मी तुझ्यात हरवुन गेलो न कधीच व्यक्त जाहलो तुजला निरखित राहिलो तुही मनीचे जाणले होते मी मनांत समजूनी गेलो घायाळ, होताच कटाक्षी तव काळजात विरघळलो जे घडले ते ते घडूनी गेले स्मृतींना उलगडित राहिलो रुतला अंतरी तव अबोला मी मना समजवित राहिलो — वि.ग.सातपुते […]

वेठबिगार

महानगरांच्या नशीबी नसतो भावनांचा ओलावा निरर्थक धडपड, निर्जीव यांत्रिकता नि पोकळ गिलावा आजूबाजूला सरपटणाऱ्या हातपायांना येथे नसतो चेहेरा सारेच शोधतात निवाऱ्याला एक अपुरा कोपरा भरकटणाऱ्या पतंगागत नसते आयुष्याला दिशा परिस्थितीच्या काजळीने धुरकटणाऱ्या हाताच्या रेषा इथे आयुष्ये नाही जगत रेटली जातात आपोआप लोकलच्या रेटणाऱ्या गर्दीने फलाटावर फेकल्यागत असाच (आणखी) एकदा सूर्य मावळतो, थकला – भागला नि निघतो […]

सप्तरंग

वाहतो पवन बेभान धुंदला उधळीत गंध शब्दभावनांचे गडगडता अंबरी कृष्णमेघनां प्रीतगान, मृदगंघले वसुंधरेचे ओढ अधीर, अवीट मधुरम संथ झुळझुळणे ते निर्झराचे मन ओले, ओले चिंब चिंबले साक्षात्कार प्रसन्न वर्षाऋतुचे स्वर, पावरीचे श्रावण श्रावण सप्तरंगलेले, इंद्रधनु अंतरीचे हे स्वानंदाचे सात्विक सोहळे संगीत जणु, कृतार्थ जीवनाचे — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २२६ ५/९/२०२२

भावस्पर्ष कृपाळू

मी अलवार कवटाळीतो अंतरीच्या गतआठवांना हॄदयस्थ, ते ध्यास भास स्मृतींनाच, उलगडताना…. भावस्पर्ष ! मृदुल कृपाळू जगविती माझ्या स्पंदनांना अबोल ओंजळ भावनांची मी, रिती कुठे करू कळेना…. दिव्यत्व,भक्तीभावप्रीतीचे वेदनांची, क्षालनी सांत्वना ओघळ लोचनी जाणिवांचे स्मृतींचा, गंधाळ हुंगतांना…. माथी आभाळ सावळबाधी सांजवेळी हुरहुर पाऊलांना ओढ, हरिपावरीच्या सुरांची मी नित्य आळवितो दयाघना…. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २३२ […]

तूच सुगंधा

तुझे नित्य येणे जाणे हळूच वळूनी पाहणे नाही कधी विसरलो तुझे ते लाघवी लाजणे आठव ते सारे सुखद निःशब्दी, प्रीतचांदणे तुझे कटाक्ष सांत्वनी निर्मली तुझे गंधाळणे निष्पाप त्या जाणिवा मनास भुलवुनी जाणे तूंच हसरी कमलिका सालस ते तुझे वागणे अजूनही मी स्मरतो रुप तुझे गोजीरवाणे तू स्मरणगंधी सुगंधा तुझे उमलुनी बहरणे — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना […]

सत्यकाम

सत्य हे नेहमीच पोरकं असतं माझ्या जीवनात जर तो आला नसता तर कदाचित मीही हे मानलं नसतं पण… तसं व्हायचं नव्हतं अजूनही मला तो आठवतो आहे उमदं, आकर्षक व्यक्तिमत्व-हसरा चेहरा आणि हो, त्याचे डोळे! त्याचे डोळे विलक्षण पाणीदार होते, विलक्षण बोलके होते तो भेटताच त्याचे डोळे त्याच्या नकळत तुमच्याशी संवाद साधायला लागायचे सत्याबद्दल त्याला अपार आदर […]

निर्मोही

निर्मोही गुंतावे स्वांत सुखाया लाभते मन:शांती अंतरा सुखाया…. सुखदुःख क्षणाचे संवेदनांची छाया हाच जन्म मानवी जगुनीया जगवाया…. खेळ सारे भावनांचे भावशब्दात गुंफाया जपावित मनेमने अंतरंगा जाणुनिया….. सावरीत जीवाजीवा सुखवावी मन:काया अशाश्वती स्पंदनांची सारी मृगजळी माया…. सत्य एक अनामिक त्याची कृपाळू छाया नित्य त्याला भजावे तोच येतो सावराया…. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२२३ २/९/२०२२

कुंभार आगळा

खेळ त्याचेच सारे तो कुंभार आगळा घडवितो, तोडितो सर्वा लावीतो लळा तो जीवाचा आत्मा श्वासास जगविणारा ब्रह्मांडी त्याची सत्ता तोच एक तारणारा जगणे केवळ भोगणे प्रारब्धा मिठित घ्यावे जन्ममरण प्रवास एक चालता त्याला स्मरावे पुनरपी जननं, मरणं निर्णायक तोची ईश्वर उगाच, कशाला चिंता जगती सारे आहे नश्वर — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२२४ ३/९/२०२२

कृपाळू

दिलास जन्म मानवी देवा! काय याचू मी कृपाळू, तूची दाता तुलाच काय मागू मी…।। दिलेस, तू सारे काही तृप्त, तृप्त कृतार्थ मी सर्वार्थी तुझ्यात रमता सांगनां काय मागू मी…।। अनंता! तूच कृपाळू तव छायेत नित्य मी नांदतोस मनहृदयी देवा! काय मागू मी…।। तव अदृश्य परिस्पर्शी सुखावतो अंर्तआत्मा अमृतयोग अमरत्वाचा चिरंजीव हा जीवात्मा..।। – वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 […]

1 29 30 31 32 33 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..