नवीन लेखन...

आत्मरंग

सप्तसुरांनी ब्रह्मांड वेढिले शब्दही आले नाचत नाचत… चंद्रफुलांची उधळण झाली निळ्यासावळ्या गगनात… भावफुलांना ठावुक नव्हते मनांतील हे आत्मरंग सात… शब्द कोणते, भावरंग कोणते हृदयी, प्रीती कुणाची गात… आळविता गीतात सुरांना गंधर्वाची तान अवकाशात… प्रभु तुजपुढे लावियली मी गाभारी निरांजनी फुलवात… आता उजळू दे मनगाभारा भावनांच्या निष्पाप मंदिरात… — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २५१ ८/१०/२०२२

उद्ध्वस्त मने

दुर्दैवाचा नाद निनादे झाकोळून ये आता निराश माझे मन हे गाते मरणाच्या गाथा मरण आहे मिसळून जेथे आयुष्याशी एखाद्या कुणी धराव्या कशास आशा अप्राप्याच्या एखाद्या ॥ १ ॥ मरणास माझ्या मीच जातो हात पसरोनी सामोरा उपेक्षिताचा निर्वाणसोहळा, साक्षीला मी अन् एक कोपरा मनात माझ्या धडपडून आसू जमवू पहातो ओंजळभर गीत माझे तुलाच लिहिले मृत मना हे […]

आत्मानंद

जगुनीया झाले सारे काही आता मागणे काहीच नाही… कसले सुख, कसले दुःख संवेदना काहीच उरली नाही… प्रारब्ध संचिती जन्म लाभला भोगायचे काही राहिले नाही… उरलेले क्षण आनंदात जगावे आता कुणाला दुःखवू नाही… लौकिक , भौतिक नश्वर सारे सोबत कधीच काही येत नाही… आत्मानंद ! केवळ मन:शांती याविण दूजे सुंदर सत्य नाही… — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना […]

वैफल्य

निरर्थक शब्दांची दाटी, का होते कुणास ठाऊक काहीच कळत नाही सजवलेली शय्या, ताटी का होते कुणास ठाऊक काहीच कळत नाही ॥ १ ॥ मनातले उमटत नाही कुणास ठाऊक का म्हणून सुटा पसारा जुळतच नाही कुणास ठाऊक का म्हणून ॥२ ॥ वेड्यागत हव्यास का हा सामान्यतेहून दूर जाण्याचा धडपडूनही जेव्हा फसतो प्रयत्न हिमालयाला छेदण्याचा ॥ ३ ॥ […]

मती गुंग होते

कधी कधी मती गुंग होते माणुस कधी कळत नाही भेटीसाठी कुणी उताविळ तर कुणी, बोलतही नाही….। बंद दरवाजे, बंद खिडक्या कोण शेजारी कळत नाही मी आणि फक्त कुटुंब माझे संसारी दुसरे कुणीच नाही….। संवादही सारे खूंटले आता प्रेमवात्सल्यही जगले नाही व्यवहारी, जग हे झाले सारे कुणा कुणाची फिकिर नाही….। सुसंस्काराची सुकली माती ओल, कुठेच झिरपत नाही […]

राम नाम ओठी जपता

राम नाम ओठी जपता रामराया हॄदयी वसतो… करावा रामनामाचा धावा तो सदैव श्वासात नांदतो… राम नाम सागर मोक्षानंदी दुःख वेदनांतुनी सावरतो… राम अवतार विश्वात्म्याचा साऱ्या ब्रह्मांडाला रक्षितो.. तो देवगुणी , सदविचारी सकलांच्या मना उजळीतो.. विध्वंसक तो षडरिपूंचा शाश्वती ब्रह्मांडी नांदतो… जीवन रामनामी सन्मार्गी जाणता जीवा मोक्ष लाभतो.. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २२९ ८/९/२०२२

कुणाकुणासाठी कोठपर्यंत…. कुणी का रडावे

कोण होतो, आहे कुठे, कुठे हा जाईन कोण जाणे, किती वळणे कशी मी पाहीन कुणाकुणाचे कोण जाणे कसे कधी नाते जडावे कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे! आगीने हृदयस्थ माझ्या सागर टाकावा गिळून मस्तकाच्या ठिकऱ्या – ठिकऱ्या काळीज माझे छेदून शून्यातल्या सुरुवातीने पुन्हा शून्यात का विरावे कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे? मनी जन्मलेल्या स्वप्नाने का मला पोरके […]

आत्माराम

आत्माराम, पांडुरंग माझा अंतरीचाच विश्राम माझा…।।धृ।। चालतो सदासदा सांगाती सदासर्वदा देई सन्मति जागवितो तो राम अंतरी कृपाळू आत्माराम माझा…१ जग, व्यवहारी तो रमतो सत्कर्मी, चाल चालतो निष्कलंक सत्य दावितो निर्विकार परमात्मा माझा…२ जन्मुनीही मरण जीवाला व्यालेले हेच सत्य सृष्टिला भक्तीप्रीती गंध दरवळावा सांगतो आत्माराम माझा…३ सत्यात सदा नांदते शांती असत्यात, अंती अशांती याचीतो आता आत्मशांती भजण्या […]

मधुस्पर्श

चंद्रमाच तो पौर्णिमेचा आभाळ ते चांदण्यांचे झोंबता शीत धुंद वारा हितगुज ते मनामनांचे… आसमंत गंधाळलेला नाचती मयुर भावनांचे गुंतती अधर पाकळ्या मधुस्पर्श, प्रीतभावनांचे… श्वासातुनी श्वास गुंतता नि:शब्दी गुंतणे प्रीतीचे सारेच, तृप्तीचे हिंदोळे शुभ्रचांदणे आत्मसुखाचे… शांतले तन मन निरागस पाझर निष्पाप लोचनांचे मुक्त मोकळे, रिक्त सारे हे बंध, या रम्य जीवनाचे… — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. […]

आता आस उरली नाही

दिसे किनारा, निवता वारा तेवती संध्यादीप काही आता, आस उरली नाही ॥ पूर्वायुष्य या पुसत्या रेषा नव्या धुक्यात अशा विराव्या ना भविष्य, नसे वर्तमान, उगा दुःख काही आता आस उरली नाही ॥ १ ॥ न जगताच जे जगले जीवन, त्यातच मन उबले थरथर मनीची शरीरी उतरुन राही आता आस उरली नाही ॥ ३ ॥ भयाणतेच्या सीमेवरी […]

1 28 29 30 31 32 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..