नवीन लेखन...

पोकळ दिखावा

सारा असतो फक्त दिखावा मृगजळा सारखी सारी नाती कुणीच नसते, कधी कुणाचे इथे स्वार्थापोटी जुळती नाती दिल्याघेतल्याचे हे जग सारे त्याविण कां? कुणी सांगाती भाव लोचनी भोळे, भाबडे भरोसी, जीव जातो गुंतुनी गळाभेटी, दिखावा पोकळ पण हे सारेच कळते सर्वांती विकलांग होती श्वास जेंव्हा जीव कासवीस होतो एकांती –वि.ग.सातपुते( भावकवी ) 9766544908 रचना क्र.२६८ २२/१०/२०२२

माझा भारत

दिव्यत्वाचा ध्यास जेव्हा मनास माझ्या घेरुन टाकतो वेड्यासारखा मी पुटपुटतो माझा भारत, माझा भारत ॥ १ ॥ तुझ्यावर जगणारी पाहून टोपीखालची बांडगूळं मी उगा विव्हळतो माझा भारत, माझा भारत ॥ २ ॥ तुझ्या वेदनेची कळ माझ्या काळजात उठते माझ्या जीवनाचा मंत्र तेव्हा माझा भारत, माझा भारत ॥ ३ ॥ तूच माझा जिव्हाळ्याचा एकमेव अर्थ जगण्याचा सत्ताधांना […]

सत्कर्म फ़ळा यावे

गतजन्मांचे, सत्कर्म फळाला यावे जन्मुनी जगती मानव जन्मी जन्मावे… सकल शक्तीचे, घेवुनी दान विवेकी नरदेही, हरिहराने वाजतगाजत यावे… असुरी, प्रवृत्तिंच्या निर्दालनासाठी सर्वेश्वराने, आता ब्रह्मांडा सावरावे… रामराज्याची सुखस्वप्ने जगण्यासाठी प्रभुरामाने, पुन्हा जगती जन्मा यावे… आत्मरंगी तृप्तलेल्या आत्मारामा मोक्षामृत, पाजीत नारायणाने यावे… गतजन्मांचे ते सत्कर्म फळाला यावे जन्मुनी जगती मानव जन्मी जन्मावे… –वि.ग.सातपुते( भावकवी) 9766544908 रचना क्र. २६७ […]

नि:शब्दी मौन

अव्यक्त, निःशब्दी मौन मिटलेले निरागस डोळे… सांग कसे मी समजावे हितगुज तुझ्या मनातले… नित्य तुझीच गं आठवण मन्मनी प्रीतभाव गुंतलेले… हेची सत्य अजुनही उरात मग शब्द अबोल कां झाले… जीवास, प्रीतदान भाळीचे मन भावनांत कां उगा गुंतले… सखये बोल नां सत्य एकदा सांग नां तूं तुझ्याच मनातले… होवू दे मनहृदय शांत आता कळू दे प्रीतभाव लोचनातले… […]

रायगडा

नको रायगडा, तू रडू नकोस कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते शिवस्पर्शाची पावन धूळ मी मस्तकी लावताना तू विषण्णपणे हसला होतास अन् काळजाला हात घातल्यागत तुझी जखम वाहू लागली तुझ्या तोंडच्या शिवकथा ऐकताना ढासळणारी मातीही जीव गोळा करुन थांबली होती गादीवरच्या खादीमध्ये गहाणलेली मराठी अस्मिता पाहून तू वेडापिसा झाला होतास तुझ्या असहाय नजरेत तरळणाऱ्या […]

जीवनखेळी

भरोसा नसला जरी श्वासांचा जीवनखेळी सहजी खेळावी… मनात असावा स्पर्श प्रीतीचा भावशब्दातुनी नाती जपावी… वाळवंटातही अंकुर फुटतो भावनांना फुटावी शब्दपालवी… गीतातुनी उमलावे हृद्य मनीचे फुलांफुलांतुनी प्रीती फुलावी… आलो मोकळे, जाणार मोकळे जीवास वृथा आसक्ती नसावी… सुखनैव जगावे अन जगवावे अंतसमयी मनास खंत नसावी… –वि.ग.सातपुते.(भावकवी ) 9766544908 रचना क्र. २६५ १९/१०/२२

कालचक्र

दयाघनाची अगाध लीला सारे शब्दांच्या पलिकडले सृजनशीलतेचे अगम्य कोड़े प्रारब्धाचे दृष्टांत आगळे… ब्रह्मांड ! साक्षात्कार ईश्वरी चराचर निसर्गात रंगलेले सप्तरंगली सृष्टी मनोहर वैविध्यतेत रूपरंग नटलेले… असीम अंबर, अथांग सागर नाते धरेचे चैतन्यात रमलेले अनाकलनीय रुपे भगवंताची अस्तित्व, देवत्वाचे रुजलेले… तोच सार्वभौमी सत्ताधीश सत्य अंतिम श्वासात उरलेले तोच जगवितो अन तारितो कालचक्र अखंडित चाललेले…. –वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना […]

अस्मिता

मराठी मना माझ्या नको अंत पाहू पेटलेल्या युगी या नको मृत राहू ॥ धृ ॥ मराठी मना काय तुझी ही अवस्था कशी अस्मितेची तुला ही अनास्था मना-माझ्या मित्रा, ही कोणती रे निद्रा जिवंतपणाला ही का आली सुस्तमुद्रा मनोस्फुल्लिंगांना ही टाकतो मी ठिणगी होण्यासाठी पुन्हा जिवंत, जाग पाहू ॥ १ ॥ कुणी आणावा राजा शिवाजी राणा मराठी […]

झुळझुळ

विरहात जरी कासाविस जीव हॄदयातुनी , पाझरते भावप्रीत अजुनही मन तुझ्यात गुंतलेले स्मरणगंधला गंधाळ स्पंदनात गुलमुसलेली ती सांज क्षितिजी जणु रंगली तुझ्याच प्रतिबिंबात मनांगणी दरवळते तीच बकुळी मंत्रमुग्धली माझ्या भावशब्दात दुःख वेदनांचे सावट जरी अंतरी तरतो तव अस्तित्वाच्या खुणात तुझ्याच रुपात जगविते कविता प्रीतभावनांची झुळझुळ अंतरात. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२६२ १६/१०/२०२२

कल्याणकारी अदृष्य

हसत जगावे हसत मरावे. क्षणक्षण, धुंद मुक्त जगावे स्वसुखातची रमता रमता अंतरात विवेका जागवावे…. मी जे वागतो, तेच बरोबर असे भ्रामक निष्कर्ष नसावे जीवात्म्याला त्या मन असते कां? उगा कुणाला दुखवावे…. अंती हिशेबात तोलणाऱ्या चित्रगुप्ताला सदैव स्मरावे संचित सत्कर्माचे, चिरंजीव मनांधाराला, उजळीत रहावे…. माणसा, माणसात देव पहावा कल्याणकारी अदृष्या जाणावे अस्तित्व, श्वासांचेही बेभरोसी मनामनाला नित्य जपत […]

1 26 27 28 29 30 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..