नवीन लेखन...

रोपाचे बनता झाड

रोपाचे बनता झाड,फांदी अन् फांदी डंवरे, सडा पडे खाली फुलांचा, जणू गालिचाच पसरे, फांद्या फुटण्याआधी कसे, धुमारे तिथे फुटती, बघतां बघतां आकार वाढून, तिज फांदी म्हणती, किती बहर येई फुलांचा, ती भरे *नखशिखांत बघणारा हरखून जाई , कुठे फांदी-? याच भ्रमात, फूल अन् फूल उमले, जागा नाही कुठे उगवण्या लेकुरवाळ्या फांदीलाही, अभिमान वाटे मिरवण्यां, फुले माझी, […]

काळजाच्या भेटी

काळजाच्या भेटी, आलीस सई गाठी, खूण पटता आत्म्यांची, किती आनंदी दिठी,–!!! ||१|| काळजाच्या भेटी आलीस सखे राती पूर गप्पांचा येता , वाढत जाय भरती,–!!! ||२|| काळजाच्या भेटी , आलीस मैत्रिणी, जिवांचे दुवे सांधीत, घट्ट हृदयाची नाती,–!!! ||३|| काळजाच्या भेटी, आलीस सये पाठी, सुखदुःखांच्या हिंदोळी, दोघी बसू एकाच झुली,–!!! ||४|| काळजाच्या भेटी , आलीस तू सहेली, सह […]

चादर कायेवर लपेटून धुक्याची

(एका हिंदी कवितेचा मुक्त अनुवाद) चादर कायेवर लपेटून,धुक्याची, पायवाटेची सैर करावी, थेंब स्पर्शती पायांना अनवाणी, जाणीवही ती सुखावह किती,–!! निळे-गहिरे स्वैर तरंग, हृदयाला जेव्हा छेदती, असेच आपुले गुपित एखादे, ते कसे उलगडती,–! केसांच्या बटांना स्पर्शून, झुळूक जाते एखादी, आपल्या प्रेमाची जाणीव, देऊन जाते ना कधी,–!!! दूरवर उभ्या झाडांवर, पक्षी कूजन करिती, हृदयाला ताजेतवाने, करुन सोडती अगदी, […]

स्वच्छंद पक्षी

कोण दिसे हा पाण्यामध्ये, असावा माझाच भाईबंद, चोच बांकदार, रूप देखणे, मनाने दिसतोय स्वच्छंद, गुबगुबीत पांढरी पाठ, कोरीव वर काळ्या रेघा, नजर शोधक पाण्यात, भक्ष्यच भागवेल भुका , सुळकन जो वर येईल, मटकावेन आधी त्याला,–!!! कळणारही नाही याला, कधी गिळले मी माशाला,-? डोळे तीक्ष्णमाझे, नजरही अगदी करडी, पाण्यातील या पक्ष्याची, मात्र भासे मज बेगडी,–!!!! हिमगौरी कर्वे.©

ज्योत

शान्त समईत जशी वात, तशी समाजात स्त्री जात, जळून जळून प्रकाश देत, क्षणिक फक्त मोठ्या होत,–!!! पणतीची ज्योत तशी, आमुची ही असे जात,– जगच छोटे भोवतालचे,– स्वयंप्रकाशी मोठे करत, लामणदिव्यात उर्जास्त्रोत, रात्रंदिनी सारखे *अविरत, मंद असूनही सतत, कार्यरत, भोवताली प्रकाश पसरवत,–!!! नंदादीपातील जशी ज्योत, स्त्री तशी तिच्या संसारात, हळूहळू अगदी तेवत,–!!! दुसऱ्याला प्रकाशमान करत,–! निरांजनातील छोटीवात, […]

सत्य, अहिंसा, साधी राहणी

सत्य, अहिंसा, साधी राहणी, . महात्मा गांधींची विचारसरणी तत्वांची सगळ्या किती हेटाळणी, ‌ कोण आणतो सांगा आचरणी, –!!! असत्याच्या आधाराने, हिंसक, मारक, वर्चस्वाने, वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे”च निराळी,-! स्वातंत्र्याचा वाईट अर्थ, सगळे स्वैराचाराचे भक्त, माणसाचे वागणे नि:सत्व, गांधींच्या तत्वांना तडा जाई,–!! सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला, आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने, समतोल निसर्गाचा बिघडवला,-! घर , गाव […]

तू एक

छान वाटले भेटता तू एक दूर जाऊ नको वेगळी तू एक………  ! भेट तुझी होणे गोष्ट साधी नाही भावले मना असे कुणी आधी नाही……….! भावना छान ही आवडते कुणी मनात घर एक करे नवे कुणी………..! अंतर आहेच खूप गोष्टींचे नात्यात नको यामुळे अंतर…………! कल्पनेतले हे सुंदर जग न्यारे मनास लागू नये वास्तवाचे वारे………..! कवितेने दिली भेट […]

चल, चांदण्यांची सैर करू

चल, चांदण्यांची सैर करू,अंबरी, ढगां-ढगांत विहरू, कडेकडेने मेघांच्या,जाऊ, हळूच,मऊ मऊ दुलईत शिरू,-!! मिचकावून डोळे आपुले, चांदण्यांची वरातच पाहू, सुंदर चमचमत्या प्रकाशात, त्यांची आभा नीट न्याहाळू,–!! काळ्याशार गालिच्यावर नभांत, वावरते प्रकाश–झोत पाहू, इकडून तिकडे हलत्या प्रवासी, चंद्राचीही धांदल बघू,—!! कोण त्यांच्यात अधिक सुंदर, मनी मानसी स्पर्धाच लावू, चंद्राचा मुखडा लोभसवाणा, पाहून आपण अचंबित होऊ,–!! धरेवर ती मजा […]

काळजाच्या भेटी, आलीस सई गाठी,

काळजाच्या भेटी,आलीस सई गाठी, खूण पटता आत्म्यांची, किती आनंदी दिठी,–!!! ||१|| काळजाच्या भेटी आलीस सखे राती पूर गप्पांचा येता , वाढत जाय भरती,–!!! ||२|| काळजाच्या भेटी , आलीस मैत्रिणी, जिवांचे दुवे सांधीत, घट्ट हृदयाची नाती,–!!! ||३|| काळजाच्या भेटी, आलीस सये पाठी, सुखदुःखांच्या हिंदोळी, दोघी बसू एकाच झुली,–!!! ||४|| काळजाच्या भेटी , आलीस तू सहेली, सह राहुनी […]

कीटकाचे ब्रह्मांड

कीटक ते लहान असूनी रहात होते फळामध्यें विश्व तयाचे उंबर फळ जीवन घालवी आनंदे   १ ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती उंबराच्या नसे पलिकडे ज्यासी ते अथांग समजले बघूनी त्या एका फळाकडे   २ माहित नव्हते त्या कीटकाला झाडावरची अगणित फळे सृष्टीतील असंख्य झाडे कशी मग ती त्यास कळे   ३ आपण देखील रहात असतो अशाच एका फळावरी हीच फळे असंख्य […]

1 219 220 221 222 223 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..