नवीन लेखन...

स्मरण असू दे

हे जगदंबे !  सदैव होते नाम मुखी गे लोप पावले आज कसे ते तू मज सांगे…..१ लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी….२ काही हवेसे वाटू लागले एके दिवशी विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी….३ आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती….४ तगमग करूनी तेच मिळविता आज […]

हिरवेगार तृणपाते,… वाऱ्यावर डोलत होते

हिरवेगार तृणपाते,वाऱ्यावर डोलत होते, मजेत इकडून तिकडे, मान करत गुणगुणत होते,— लहान बालिश वय कोवळे, कंच हिरव्या रंगात खुलत, खुशीत झोके घेत होते, बाळां काय ठाऊक असे, किती कठीण असते जगणे-? मौजमजा आणि हुंदडणे, करत करत एकदम कोसळणे वास्तवाशी सामना होतां, भलेभले धुळीस मिळती, हे तर इवलेसे तृणपाते, कितीशी असेल लढाऊ शक्ती,-? कुणीतरी आले तिकडून, पाय […]

चुकीचे तर्क

मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता…..१, तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करित होते…२, वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला…३, बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले…४ […]

या अशा सांजवेळी

या अशा सांजवेळी,बाहुपाशी, घे जवळी, रात्र उतरून आली खाली, तुजविण जिवाची काहिली, हुरहुरते मन अशा समयी, तुझ्यासाठी,आंत तुटते काही जीव कांतर कांतर होई, आत्मा तरसे मिलनासाठी, लौकिक सुखे भोवताली, जीव कसा जळे त्यातही, तरसवे मज विरहाग्नी, तुझ्या शपथांची येतां स्मृती, उले काळीज माझे किती, तुला कल्पनाही नाही, प्रेमाचीच लागे कसोटी, ताटातुटीचीव्यथा ही, कोरडेपण तुझे मजसी, सारखे […]

कृष्ण बाललीला

चकित झाले गोकूळवासी बघून बाललीला सांगा कोण आहे तरी कृष्ण ? विचारी यशोदेला   ।।१।। प्रासादातील मोदक खातां तोंड ते उघडले मुखामध्ये मोदक नसूनी ब्रह्मांड ते दिसले   ।।२।। उच्छाद मांडूनी कालीयाने पाणी केले दुषित मर्दन करण्यासाठीं त्याचे उडी टाकी डोहात   ।।३।। पूतना असूनी राक्षसिण स्तनांत होते विष स्तनपान करुनी त्यानें तीला केले कासाविस   ।।४।। खोड्या बघूनी यशोदेनें […]

अवमूल्यन

उत्साहाने करित होता,  सारे कांहीं इतरांसाठी क्षीण होवूनी जाता शरीर,  आधार तयाला झाली काठी…१, धनाचा तो प्रवाह वाहतां,  गंगाजळीचे पाणी पाजले दुजाकरिता त्याग करूनी,  समाधानी ते इतरा केले….२, धन संपत्तीचे झरे आटतां,  प्रेमळपणाचे शब्द राहीले कालक्रमणाच्या ओघामधल्या,  दुर्बलतेस कुणी न जाणले…३, अपेक्षा ती सदैव असते,  मिळत रहावा सहयोग अवमूल्यन ते केले जाते,  दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग…४ […]

धागा धागा मिळून

धागा धागा मिळून,बांधले,खास घरटे, फांदीचा आधार घेऊन, उभ्या झाडास लटकवले, एक चोंच करी किमया, केवढी मोठी कारागिरी, पिल्लांस सुरक्षित करण्यां, माय बापाची चाले हेरगिरी, घर मोठे प्रशस्त हवेशीर, वारा चारी बाजूंनी वाहे, निसर्ग सान्निध्यातले, वाटते मोठे आरामशीर, अंडी घालून ती उबवती, वाट जन्माची पाहती, कारागीरच ते नव्या उमेदी, दार घरट्याचे असे बांधले, सहजी कोणी उतरू नये, […]

आत्म्याचे मिलन

आत्म्याचे मिलन परमात्म्याशी हेच जीवनाचे ध्येय असे आत्मा ईश्वरी अंश असूनी त्यालाच मिळण्या उत्सुक असे देह पिंजऱ्यांत अडकता बाहेर येण्या झेप घेई तो अवचित साधूनी वेळ ती कुडी तोडूनी निघून जातो कार्य आत्म्याचे अपूरे होता पुनरपी पडते बंधन चक्र आत्म्याचे चालत राही मुक्त होण्याचा येई तो क्षण डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८४०

झाडांची आज चालली रंगपंचमी

झाडांची आज चालली रंगपंचमी गाली हसे नभ, विविध रंग पाहुनी कुणी आणे हिरवा तर कुणी गुलाबी कुणी गडद ,कोणी लालेलाल झाला बुंध्यापासून कोणी हळदी ल्यालेला कुणी केशरट रंगाने अगदी न्हालेला कोणता अधिक सुंदर ते विचार करे माझा रंग बिनतोड’, ते पक्के ठरवे मागे मी, म्हणून यांचे हे सौंदर्य,– निसर्गघटक कितीतरी, असती, कोण दाखवेल असे औदार्य,–? एकट्या […]

देहातून आत्मा सुटावा.

द्व्यर्थी,तत्वज्ञानात्मक, — देहातून आत्मा सुटावा. घे स्वैर भरारी, माझ्या देखण्या पाखरा,— बद्ध पंख हे उचंबळती, सोडून ही बंदिस्त कारां,— पिंजर्‍याचे दार लागतां, जीव तुझा घुसमटे, स्वातंत्र्याच्या फोल कल्पना, सर्वच विचारा खींळ लागे आतल्या आत जीव तडफडे, सीमित जागा, नुसताच हिंडे डोळे भिरभिरत कसा शोधशी, तू आपला मुक्तपणा, –!!! जो येईल तो बोलू बघे, इथेतिथे उगा हात […]

1 217 218 219 220 221 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..