आनंदाने नाचत गात
आनंदाने नाचत गात, घेत हृदयाचे ठाव , चाललो मी पुढे पुढे , झरा माझे नाव,–!!! कपारीत डोंगराच्या, जन्म होई माझा, झुळझुळ वाहत जाता, होत असे मी मोठा,–!! शांत निर्मळ पाणी, हळूहळू पुढे जातसे , पारदर्शक थेंब लोलक, नजरेत ना भरती कसे,–!! असे धवल थेंब धावती, त्यांची बनते सुरेख नक्षी, ती बघण्यास उत्सुक हा, सारखे येती माझ्यापाशी,–!! […]
