घनदाट त्या वृक्षाखाली
घनदाट त्या वृक्षाखाली,पांथस्थ विश्राम करे, दमुनी भागुनी थकुनी, आपले ठेवे ओझे खाली,–!!! माथ्यावर उन्हे तळपती, सावलीत आश्रय घेत असे, थंडगार पाणी पिऊनी, तहान तो भागवत असे,–!!! वाटसरू तो गरीब बिचारा, त्याच्या भुकेलाही धोंडे, पाणीच भूक भागवे, सोडवीत पोटाचे कोडे,–!!! गाठोडे आपले घेऊन डोई, पांथस्थ हात-पाय पसरे, डोळे मिटुनी जमिनीवरी, शांत निवांत होऊन पहुडे,–!!! निद्रादेवी रुंजी घाली, […]
