मर्यादा

मर्यादेचा बांध घालूनी,  मर्यादेतचि जगती सारे  ।
अनंत असता ईश्वर ,  मर्यादा घाली त्यास बिचारे  ।।

जाण जगाची होई इंद्रियांनी,  त्याला असती मर्यादा  ।
विचार सारे झेपावती,  ज्ञान शक्ती बधूनी सदा  ।।

अथांग वाटे विश्वमंडळ,  दाही दिशांचा भव्य पसारा  ।
ईश्वर आहे थोर त्याहूनी,  मोजमापाच्या उठती नजरा  ।।

कशास करीतो तुलना सारी,  भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी  ।
अज्ञानाने पडती मर्यादा,  अनंत तत्वास त्याच क्षणी  ।।

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

About डॉ. भगवान नागापूरकर 1413 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…