जखम

खरंच रे वेड्या,तुला कळला नाही, माझ्या मनीचा भाव,
नकळत कोरून गेलास,न भरलेल्या जखमेचा घाव…
गळून पडेल का ही जखम? की जाईल ती पण सुखून,
की चीघळून जाईल पुन्हा,सोसेल का हे तळपतं ऊन?
तू दिली आहेस म्हणून खरंच का हिला जपून ठेवू?
सांगना,सजवून धजवून अंगावरचं टपोरं गोंदण मानून घेवू ?
मलम नाही रे हिला,असा कसा रे केलास वार?
उसळणाऱ्या तलवारीतही नव्हती,तुझ्या जिभे एवढी धार…
उफाळून आलंय बघ हे हृदय, स्वत:स मर्यादा घालून,
अश्रूंनाही ठेवतंय मुठीत, भावनांची करपलेली खपली सोलून…

— कु. श्र्वेता काशिनाथ संकपाळ.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…