नवीन लेखन...

रूप असे देखणे

रूप असे देखणेकाळजां भिडले भारी, डोळे असती लकाकते, पाणीदार जसे मोती, काया कशी तुकतुकीत, नजर फिरता हाले, सुंदर तांबूस वर्ण, त्यावर पांढरे ठिपके, शिंगांची नक्षी डोई, दिसते वर शोभुनी, हिंडते बागडते रानी, कुणी बालिका की हरणी, –?? चपल चंचल वृत्ती, अचूक आविर्भाव मुखी, क्षणोक्षणी मान वेळावी, भय दाटले नयनी,–!!! पाय मजेदार हलती, नाजुकसे ते हडकुळे, पण […]

देह मनाचे द्वंद

दोन स्थरावर जगतो मानव,  आंत बाहेरी आगळा  । भिन्न भिन्न ते दर्शन घडते,  यास्तव कांहीं वेळा  ।। एकच घटना परी विपरीत वागणे  । दुटप्पेपणाचा शिक्का बसतो,  याच कारणे  ।। देहा लागते ऐहिक सुख,  वस्तूमध्ये जे दडले  । अंतर्मन परि सांगत असते,  सोडून दे ते सगळे  ।। शोषण क्रियेत आनंद असतो,  ही देहाची धारणा  । त्यागमधला आनंद […]

मुके भाव

आज लोपले शब्द ओठींचे,  भावनाच्या आकाशीं प्रखर बनतां त्याच भावना,  विचार जाती तळाशीं….१, भावनेला व्यक्त करण्या,  सांगड लागे शब्दांची थोटके पडती शब्द सूर ते,  गर्दी होता विचारांची…२, भावनांचे झरे फुटूनी,  विचार जलाशय झाले विचारांचे बनूनी धबधबे,  वाहू मग लागले…..३, आकार देती शब्द भाषा,  बांध घालूनी विचाराला निश्चीत होतो वेग नी मार्ग,  आकार देता भावनेला….४, भाषेमधली शक्ती […]

जीवनाचा खरा आनंद

केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   ।।धृ।। बालपणाची रम्यता    मजा केली खेळ खेळता निरोप देता बालपणाला   नाद गेला खेळण्याचा केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।१।। तारुण्याचे सुख आगळे   मादकतेने शरिर भारले बहर ओसरु लागला   दूर सारतां घट प्रेमाचा केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।२।। प्रौढत्वाची शानच न्यारी   श्रेष्ठतेची ठरे भरारी येतां दुबळेपणा शरिराला   उबग येई संसाराचा केव्हां […]

चादर कायेवर लपेटून,धुक्याची

एका हिंदी कवितेचा मुक्त अनुवाद चादर कायेवर लपेटून,धुक्याची, पायवाटेची सैर करावी, थेंब स्पर्शती पायांना अनवाणी, जाणीवही ती सुखावह किती,–!! निळे-गहिरे स्वैर तरंग, हृदयाला जेव्हा छेदती, असेच आपुले गुपित एखादे, ते कसे उलगडती,–! केसांच्या बटांना स्पर्शून, झुळूक जाते एखादी, आपल्या प्रेमाची जाणीव, देऊन जाते ना कधी,–!!! दूरवर उभ्या झाडांवर, पक्षी कूजन करिती, हृदयाला ताजेतवाने, करुन सोडती अगदी, […]

कोण दिसे हा पाण्यामध्ये

कोण दिसे हा पाण्यामध्ये,असावा माझाच भाईबंद, चोच बांकदार, रूप देखणे, मनाने दिसतोय स्वच्छंद, गुबगुबीत पांढरी पाठ, कोरीव वर काळ्या रेघा, नजर शोधक पाण्यात, भक्ष्यच भागवेल भुका , सुळकन जो वर येईल, मटकावेन आधी त्याला,–!!! कळणारही नाही याला, कधी गिळले मी माशाला,-? डोळे तीक्ष्णमाझे, नजरही अगदी करडी, पाण्यातील या पक्ष्याची, मात्र भासे मज बेगडी,–!!!! हिमगौरी कर्वे.

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला…३ झाकण उघडा,  दुःख दिसे आत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई…५ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

खेळण्या नसे पर्याय

दु:खाचे तूं देवूनी चटके,   सत्वपरिक्षा ही बघतोस प्रतिकूल ती स्थिती करूनी,  झगडत आम्हां ठेवतोस.. १ खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा खेळातूनि अंग काढतां,  जगण्याच्या मिटतील खुणा…२ खेळगडी तो असूनी तुम्हीं,  मैदानासम विश्व भासते तन्मयतेनें खेळत असतां,  खचितच यश तुम्हा येते…३ विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा बसू नका हतबल होवूनी,  गमवाल त्या […]

अंतर्मनातील आवाज

ध्यान लागतां डूबूनी जाई अंतर्यामीं बाह्य जगाला त्याच क्षणीं विसरतो मी चित्त सारे केंद्रित होई आत्म्याकडे दुर्लक्ष्य होऊनी देहाचा विसर पडे संवाद होता आत्म्याशी विचारा सारे आतून कांहीं आंतल्या आवाजांत  सत्याचा भाव भविष्यातील घटणाचा त्यासी ठाव नियमीत ध्यान साधना करती इतर जीवांचे प्रश्न समजती ऋषीमुनीना ध्यान शक्ती अवगत राजाश्रय मिळूनी राज गुरु ठरत प्रश्न सोडवी ध्यान […]

कबूल

कबूल, आम्हीच त्यांना निवडून दिलेले! कबूल, आम्हीच त्याबद्दलच भोगलेले! — श्रीकांत पेटकर  कौशल

1 220 221 222 223 224 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..