नवीन लेखन...

या अशा सांजवेळी

या अशा सांजवेळी,बाहुपाशी, घे जवळी, रात्र उतरून आली खाली, तुजविण जिवाची काहिली, हुरहुरते मन अशा समयी, तुझ्यासाठी,आंत तुटते काही जीव कांतर कांतर होई, आत्मा तरसे मिलनासाठी, लौकिक सुखे भोवताली, जीव कसा जळे त्यातही, तरसवे मज विरहाग्नी, तुझ्या शपथांची येतां स्मृती, उले काळीज माझे किती, तुला कल्पनाही नाही, प्रेमाचीच लागे कसोटी, ताटातुटीचीव्यथा ही, कोरडेपण तुझे मजसी, सारखे […]

कृष्ण बाललीला

चकित झाले गोकूळवासी बघून बाललीला सांगा कोण आहे तरी कृष्ण ? विचारी यशोदेला   ।।१।। प्रासादातील मोदक खातां तोंड ते उघडले मुखामध्ये मोदक नसूनी ब्रह्मांड ते दिसले   ।।२।। उच्छाद मांडूनी कालीयाने पाणी केले दुषित मर्दन करण्यासाठीं त्याचे उडी टाकी डोहात   ।।३।। पूतना असूनी राक्षसिण स्तनांत होते विष स्तनपान करुनी त्यानें तीला केले कासाविस   ।।४।। खोड्या बघूनी यशोदेनें […]

अवमूल्यन

उत्साहाने करित होता,  सारे कांहीं इतरांसाठी क्षीण होवूनी जाता शरीर,  आधार तयाला झाली काठी…१, धनाचा तो प्रवाह वाहतां,  गंगाजळीचे पाणी पाजले दुजाकरिता त्याग करूनी,  समाधानी ते इतरा केले….२, धन संपत्तीचे झरे आटतां,  प्रेमळपणाचे शब्द राहीले कालक्रमणाच्या ओघामधल्या,  दुर्बलतेस कुणी न जाणले…३, अपेक्षा ती सदैव असते,  मिळत रहावा सहयोग अवमूल्यन ते केले जाते,  दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग…४ […]

धागा धागा मिळून

धागा धागा मिळून,बांधले,खास घरटे, फांदीचा आधार घेऊन, उभ्या झाडास लटकवले, एक चोंच करी किमया, केवढी मोठी कारागिरी, पिल्लांस सुरक्षित करण्यां, माय बापाची चाले हेरगिरी, घर मोठे प्रशस्त हवेशीर, वारा चारी बाजूंनी वाहे, निसर्ग सान्निध्यातले, वाटते मोठे आरामशीर, अंडी घालून ती उबवती, वाट जन्माची पाहती, कारागीरच ते नव्या उमेदी, दार घरट्याचे असे बांधले, सहजी कोणी उतरू नये, […]

आत्म्याचे मिलन

आत्म्याचे मिलन परमात्म्याशी हेच जीवनाचे ध्येय असे आत्मा ईश्वरी अंश असूनी त्यालाच मिळण्या उत्सुक असे देह पिंजऱ्यांत अडकता बाहेर येण्या झेप घेई तो अवचित साधूनी वेळ ती कुडी तोडूनी निघून जातो कार्य आत्म्याचे अपूरे होता पुनरपी पडते बंधन चक्र आत्म्याचे चालत राही मुक्त होण्याचा येई तो क्षण डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८४०

झाडांची आज चालली रंगपंचमी

झाडांची आज चालली रंगपंचमी गाली हसे नभ, विविध रंग पाहुनी कुणी आणे हिरवा तर कुणी गुलाबी कुणी गडद ,कोणी लालेलाल झाला बुंध्यापासून कोणी हळदी ल्यालेला कुणी केशरट रंगाने अगदी न्हालेला कोणता अधिक सुंदर ते विचार करे माझा रंग बिनतोड’, ते पक्के ठरवे मागे मी, म्हणून यांचे हे सौंदर्य,– निसर्गघटक कितीतरी, असती, कोण दाखवेल असे औदार्य,–? एकट्या […]

देहातून आत्मा सुटावा.

द्व्यर्थी,तत्वज्ञानात्मक, — देहातून आत्मा सुटावा. घे स्वैर भरारी, माझ्या देखण्या पाखरा,— बद्ध पंख हे उचंबळती, सोडून ही बंदिस्त कारां,— पिंजर्‍याचे दार लागतां, जीव तुझा घुसमटे, स्वातंत्र्याच्या फोल कल्पना, सर्वच विचारा खींळ लागे आतल्या आत जीव तडफडे, सीमित जागा, नुसताच हिंडे डोळे भिरभिरत कसा शोधशी, तू आपला मुक्तपणा, –!!! जो येईल तो बोलू बघे, इथेतिथे उगा हात […]

नाती- गोती कसली ?

नाती- गोती कसली,?करती कशी रक्तबंबाळ, जीव’च नाही, आत्माही, होती सारेच घायाळ,–!!! कुठले मित्र,कसले सखे, कशाशी खातात मित्रत्व, स्वार्थ भांडणे वाद ,— एवढीच जगण्याची तत्वं,–!!! कसली नीती कशाची मत्ता, एक दुसऱ्याचा गिरवी कित्ता, खरेपणाची बूंजच नसता, असत्याचीच इथे सर्व सत्ता,–!!! माझी पोळी, तुझेच तूप, नव्हे, तुझी पोळी तुझेच तूप, झाले माझेच ते,तू कितीही खप, तू खोटा, बाप […]

त्या झऱ्यापाशी, एकच झाड उभे होते,

त्या झऱ्यापाशी, एकच झाड उभे होते, निश्चल, निर्धास्त, अढळ, वाऱ्यावर झुलत होते , वर्षे गेली दिन गेले, रात्री आणि दिवस सरले, अनेक बाके प्रसंग आले, आले गेले नि परतले, झाड मात्र तसेच राहिले, झऱ्याकाठी लोक येती, पाण्याने ताजेतवाने होती, अनेक म्हातारे कोतारे , डोळ्यातून पाणी काढती, त्यांच्या असती किती, तारुण्यातील गोड स्मृती, तिथेच येती तरुण-तरुणी, हातात […]

तूच माझी राधिका

तूच माझी राधिका,तूच माझी प्रेमिका, मोहिनी माझी तू , तूच माझी सारिका, –!!! मुसमुसते प्रेम तू , सौंदर्य ओसंडून वाहे, मदनाची रती तू , भित्र्या डोळ्यांनीच पाहे ,–!!! कमनीय सिंहकटी तुझी, बाहूत माझ्या सामावे, लाल कोवळे ओष्ठद्वज, डाळिंबीची जणू फुले,–!!! मोहक बांधा तुझा, जाता-येता खुणावे , कुंतलाचे मानेवर ओझे, पाठीवरचा तीळ झाके, –!!! आरस्पानी रंग-गोरा, काळजां […]

1 222 223 224 225 226 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..