आज मन आनंदले
आज मन आनंदले, सुखाच्याही पार गेले, भंवसागरी तरणे खासे, आता सोपे वाटले,–!!! दुनियादारी निभावणे, असते किती कठीण, तरीही तावून-सुलाखणे, सहजी कसे जमले,–!!! मनमोर थुई थुई नाचे, पदन्यासाची तऱ्हा वेगळी, डोळ्यातून दोन थेंब सुखाचे समस्यांची असून चलती,–! खंबीर,धीरगंभीर राहणे, तटस्थभूमिका निभावावी, येऊ देत वारे–वादळे, मात्र एक झुंज द्यावी,–! तुझ्यापेक्षा मी सरस, म्हणत त्यांन भिडावे, संकटांचे सतत घोर, […]
