नवीन लेखन...

 निती मूल्ये विसरला

विसरलास तू मानव पुत्रा, नीतिमूल्ये सगळी, काय दुर्दशा झाली तुझी, काय दुर्दशा झाली….।। धृ ।।   स्वप्नामध्ये दिले वचन, पाळीले ते राज्य घालवून, हरिश्चद्रांची कथा आजही करीते मान ताठ आपुली….१, विसरला तू मानव पुत्रा  नीतिमूल्ये सगळी,   राजा साठी देई प्राण, दुजासाठी होते जीवन, ‘सिंहगड’ तो घेई जिंकूनी शिवरायाची शान राखली….२, विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये […]

थवा राव्यांचा

सकाळच्या या प्रसन्न प्रहरी सूर्यकिरण पसरले अंबरी ।। उदर भरण करण्यासाठी लगबग उडाली ही पक्ष्यांची ।। कावळे, घारी, साळुंखी ही पारवे, चिमण्या, बुलबुल संगती ।। प्रत्येकाचा सूर निराळा गाऊन सवंगड्या साद घालती ।। पटकन आला थवा राव्यांचा मंदिर शिखरी क्षणभर विसावला ।। घाणेरीच्या झुडुपांमध्ये क्षणात हा मिसळून गेला ।। मोबाईल हा गप्प बसेना मग नजारा हा […]

नशिब

नाही मज मायबाप नसे कुठे घरदार घर हे अनाथालय होतो उकीरड्यावर ।।१।। आता बघा झालो मोठा वावरतो समाजात विचारता जन्मदाता प्रश्न हे अनुत्तरीत ।।२।। थोर नशिबाचे फेरे छत्र खंबीर लाभले इथे वाढलो घडलो नाही काही बिघडले ।।३।। बद्धि अचाट अफाट माझे कवच कुडलं तिच्या जोरावर आज उच्च स्थान मिळवलं ।।४।। बळी कुमारीमातेचा शाप भोगतो जनाचा चेष्टा […]

सांजसावल्या….

सायंकाळी क्षितिजावरती पहा पसरल्या सांजसावल्या ।। पाहुनीया मोहक रंगछटा मनमोराचा फुले पिसारा किती साठवू नयनी नजारा वाटे ढगांवर पसरला पारा ।।१।। सायंकाळी क्षितिजावरती पहा पसरल्या सांजसावल्या ।। डोहात नदीच्या चमके धारा लाटांवर खेळे अवखळ वारा काठावर उभा निष्पर्ण वृक्ष हा आकाशातून आला फिरवून खराटा ।।२।। सायंकाळी क्षितिजावरती पहा पसरल्या सांजसावल्या ।। एकत्र पाहुनी हा देखावा मज […]

नाम मार्ग

ईश्वर आहे नामांत परि,  नाम कुणाचे घेता? विठ्ठल हरि पांडूरंग वा अल्ला येशू असतां   ।। असंख्य त्याची नामे असतां एकच आहे भगवान  । कांहीही म्हणता येईल तो, त्याची करीतां आठवण  ।। आठवणीतच तो लपला आहे,  दिसत नाही कुणा  । रुप कुठलेही स्मरा, दिसेल तुमच्या नयना  ।। रंग रूप आणि आकार देणे,  असते सोई साठी  । एकाग्र […]

माझे पणाची जाणीव

एका मोठ्या कारखान्याचा मालक, भासत होता छोट्या विश्वाचा चालक लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती, मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन, लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती, खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे पण नशीब दुर्दैवी बिचारे, मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला, वर्ज्य […]

गुज सांगती

झाडा वरल्या खोप्या मधल्या गुज सांगती पिला आपल्या…. १ चारा खाऊनी पाणी पिऊनी घरी आपल्या सुखी राहूनी…..२ पंखात बळ येता बक्कळ उडून जाती पिले सकळ……३ पिले उडाली आई एकली पाखरांसाठी हळहळली…..४ दुनियादारी ऐक रे न्यारी गुज सांगती समर्थ सारी….५ — सौ.माणिक शुरजोशी

ग्रह परिणाम

वळून बघता पूर्व आयुष्यी,  प्रखरतेने हेची जाणले घडले नाही कधीही ते ते, हवे असूनी मनी योजीले….१ सभोवतालची देखूनी स्थिती,  आखती योजना कल्पकतेने खेळामधली चाल नियतीची,  ध्यानी न येते दुर्दैवाने…..२ मार्ग तिचे हे ठरले असूनी,  बांधलेले इतर जीवांशी अपूर्व योजना निसर्गाची,  कळेल कुणाला सहज कशी….३ जाळीतल्या धाग्याची टोके,  गुंतली असती ग्रह गोलाशी फिरता फिरता खेच पडे,  वा […]

प्रेम

वैभवाची झुल माझ्या काल होती आज नाही … बेगडी प्रेमास त्यांच्या मग तसा तो ऊत नाही !!! ……..मी मानसी

सैनिक शौर्या

धडाडणाऱ्या तोफेवरुनी     मिठमोहरी उतरते दृष्ट न लागो सैनिक शौर्या     हेच मी मागते  //धृ//   गेला विसरुनी सगेसोयरे भाऊ बहीण आईबाप बिचारे ह्रदयावरी ठेवून अंगारे दृष्टी दूर सारी प्रेमळ नाते  //१// दृष्ट न लागो सैनिक शौर्या     हेच मी मागते   डोळ्यामध्यें अंजन घालूनी रक्षण करीतो रात्रंदिनी लक्ष तयाचे इतर जीवनीं तोड नसे ह्या त्याग वृत्तीते  //२// दृष्ट […]

1 178 179 180 181 182 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..