नवीन लेखन...

रामाची व्याकूळता

सीतेकरीता व्याकुळ झाला अवतारी चक्रपाणी, अजब ही रामप्रभू कहाणी  ।।धृ।।   पत्नीहट्ट त्याला सांगे, कांचनमृग शोभेल अंगे, मृगयेच्या तो गेला मागे प्रसंग घेई रावण साधूनी  ।।१।। अजब ही रामप्रभू कहाणी   रावण नेई पळवूनी सीता दिसेना रामा कोठे आता तरुवेलींना पुसत होता वाहत होते अश्रू नयनीं   ।।२।। अजब ही रामप्रभू कहाणी   वाणी ज्याच्या शक्ती शिवाची […]

ममतेतील खंत

भरल्या ह्रदयी ओल्या नयनी निरोप देई देवकी माता भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.  //धृ//   आकाशवाणीने बोले श्रीहरी देवकीचे तो येईल उदरी संहार करण्या दुष्टजनाचा ईश्र्वर अवतरे ह्या जगता  //१// भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.   रक्षक सारे निद्रिस्त केले कारागृहाचे दार उघडले मार्ग दिसे वसुदेवाला परि प्रभू शक्तीचे दर्शन धडता  //२ […]

मिटलेलं पान

तुटलेल्या नात्यांचे जरतारी पदर त्या ना मायेची उब प्रेमाची कदर गाठीगाठीत फक्त बोचरे आठव कशास मिरवायचे? भरजरी पाटव !……… १ तो पाठीवर हात अन डोळ्यात पाणी ते तुडुंबलेलं मन श्वासात गाणी क्षणाक्षणाने दिलं जीवनाचं दान उघडेल का कोणी ते? मिटलेलं पान !………… २ …..मी मानसी

का रमाकृष्ण ना कोणी वदले ?

का रमाकृष्ण ना कोणी वदले?….. राधे कृष्ण राधे कृष्ण, मी ही मनापासून वदले  हरि सोबत तु असतानाही, रमाकृष्ण ना कोणी वदले ….. ना तुझे नाव माझे झाले, ना तुझे मन माझे झाले  रंग मलाही सावळा लागला, तरी रमा कृष्ण ना कोणी वदले …. तुझी राधेवरची ती माया, का रे एकदाच सारे घडले मी अर्धांगिनी रुक्मिणी, तुझी […]

खेळ..

तू ध्यास, तू भास, तू न्यास हव्या प्रेमाचा ! तुजसवे खेळते सारा ….खेळ कल्पनेचा !! ….मी मानसी

देहातील शक्ति

नासिकेसमोर हात ठेवा    लागेल तुम्हां गरम हवा थंड हवा आंत जाते   गरम होऊन बाहेर येते अन्न पाणी घेतो आपण   ऊर्जा निघते त्याच्यातून आत्म्यापरि फुगते छाती   हवा आंत खेचूनी घेती आतल्या ज्वलनास मदत होते   उष्णता त्यातून बाहेर पडते भावना जेंव्हा जागृत होती   रोम रोम ते पुलकित होती अवयवे सारी स्फुरुन जाती   देहामधूनी वीजा चमकती धनको ऋणको विद्युतसाठे   […]

  सिकंदरची शांतता

दिग्वीजयाच्या स्वारीवरती,  निघे सिकंदर सैन्य घेवूनी जग जिंकण्या ध्येय मनाशीं,  महान आशा उरी बाळगूनी आश्वा रुढ ते सैनिक सारे,  सिकंदराच्या मागें धावती लगाम खेचूनी वृक्षा पाशीं,  एक साधू तो बघूनी थांवती पृच्छां करितां साधू म्हणाला,  शांत चित्त तो बसला असे मिळविण्यास ते कांहीं नसतां,  शोध प्रभूचा घेत दिसे सिकंदर वदे देश जिंकूनी,  संपत्ती घेई लुटून सारी […]

निसर्गाचे चक्र

सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे  ।।धृ।। एक एक पाकळी लहानशी कळी जाई उमलून फूल त्याचे बनून सुगंधी टपोरे फूल कांही वेळ राहील कोमेजून जाई देऊनी रुप बीजाचे परत अंकूरण होई दुजा एका झाडाचे  ।।१।। सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे एक एक पाऊल टाकते मुल वाढते हसून बनते यौवन एटदार तो दहधारी […]

अबोला

अबोलाही बोलतो काही ऐकूनी होतो असे । अबोल मी आहे कधीचा कोणाही न कळले कसे? …..मी मानसी

1 179 180 181 182 183 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..