नाम मार्ग

ईश्वर आहे नामांत परि,  नाम कुणाचे घेता?

विठ्ठल हरि पांडूरंग वा अल्ला येशू असतां   ।।

असंख्य त्याची नामे असतां एकच आहे भगवान  ।

कांहीही म्हणता येईल तो, त्याची करीतां आठवण  ।।

आठवणीतच तो लपला आहे,  दिसत नाही कुणा  ।

रुप कुठलेही स्मरा, दिसेल तुमच्या नयना  ।।

रंग रूप आणि आकार देणे,  असते सोई साठी  ।

एकाग्र करण्या चंचल चित्ता,  सारे कामी येती  ।।

निर्गुण निराकार भासतो, एकाग्र होता चित्त  ।

नाम मार्ग हे लय आणूनी, हेच असते  साधीत  ।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1595 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…