विपरीत आनंद

खोड्या करणे, त्रास देणे,   हाच बनला स्वभाव त्याचा

वाटत होते बघून त्याला,  दूरोपयोग करि तो शक्तीचा…१

पाय ओढणे, खाली पाडणे,  कपड्यावरी तो चिखल फेकणे

मारपिट ती करूनी केंव्हां,  गुंडपणा तो करित राहणे…२,

बेफिकीर ती वृत्ती तयाची,  स्वार्थाने तो भरला पुरता

तुच्छ लेखी इतर जनाना,  स्व आनंद साधत असतां….३,

‘आनंद’ मिळवणे हेच ध्येय,  जीवनाचे तत्त्व खरे ते

विपरीत मार्ग अवलोकितां,  समाधान राही दूर तेथें…४

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1601 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…