नवीन लेखन...

खरी स्थिती

मला नाही मान मला नाही अपमान, हेच तूं जाण तत्व जीवनाचे….१ कुणी नाही सबळ कुणी नसे दुर्बल हा मनाचा खेळ तुमच्या असे….२ कुणी नाही मोठा कुणी नसे छोटा प्रभूच्या ह्या वाटा सारख्याच असती….३ विविधता दिसे ती कृत्रिम असे निसर्गाची नसे ती वस्तूस्थिती….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

दिस कलतीला आल्यावर

दिस कलतीला आल्यावर ओढ लागते घराची माय बाप पोरं ढोर आसेसुन असतात कवाची येणार बा, येणार मा तोंडात साय दुधाची उरफाट जग हाय उलघाल उराची थांब जरासा पुरा कर झाली का येल केकावतो लमंढीचा म्हणतो फुकाचा तेल — शरद शहारे, वेलतूर

सुखाच्या सरींनी मन हे बावरे

सुखाच्या सरींनी मन हे बावरे किती प्रेमळ माझा बाप रे वळणा वळणावर साथ त्याचीच रे भविष्यातिल संकंटांना मिळो तुझीच ढाल रे सुखाच्या सरींनी मन हे बावरे आईच्या प्रेमळ छायेत वाढले रे सुसंस्कारीत मन माझे घडविले रे समाजात वावरतांना तिने मला जपले रे सुखाच्या सरींनी मन हे बावरे सख्या तुझ्या संगतित मी बेभान रे झुलवतोस सुखी झुल्यावर […]

सुर्य किरणें रानभर

सुर्य किरणें रानभर ऐस पैस पसरली झाडा खाली  वेडी सावली घुटमलली फुलून रानभर वेली गंध फुलाचा दरवलतो फुलपाखराचा थवा त्यावरती भिरभीरतो घालीत शिल रानपाखरे गाती गाणे मन वेडे करती मनमोहन किलबीलणे @ शरद शहारे  

हर घडी मिळो सहवास

मानव देह देवूनी ईश्वरा, उपकार केले मजवरती सेवा करण्या तव चरणाची, संधी लाभली भाग्याने ती…१, कर्म दिले तू मानव योनीसी, श्रेष्ठत्व येई ते त्याचमुळे उद्धरून हे जीवन नेण्या, कामी येतील प्रयत्न सगळे…२, मुक्त होणे जन्म मरणातूनी, साध्य होई ते प्रभूसेवेने परि तीच मुक्ती वंचित करते, आनंदमयी प्रभू दर्शने…३, एक मागणे प्रभू चरणी, मुक्ती न देयी तू […]

उगवलेला दिवस

उगवलेला दिवस सावलीसह सरकतो जगंलात गेली गुरढोर रस्ता घराचा धुंडतो ओढ लागुन पिल्याची चिमणी ही परतते काटा रूतयो पायी तरी अलगद असा काढते गाय हंबरते मनात दुधाचा ओवा पान्हावते थांब रे बाला थोडं लवकरच मी पोहोचते पावले झपाझप पडती घराच्या लागल्या ओढीन दिस गेला दुराव्याचा हाक दिली लेकरानं — शरद शहारे

देहातील शक्ती

नासिकांसमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा थंड हवा आत जाते,  गरम होवून बाहेर येते अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून भात्यापरि फुगते छाती,  हवा आत खेचूनी घेती आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते भावना जेव्हां जागृत होती,  रोमरोम ते पुलकित होती अवयवे सारी स्फूरीनी जाती,  देहामधूनी विज चमकती धनको ऋणको विद्युत साठे, […]

जीवन प्रभूमय

जीवन काय आहे    मला जे वाटत असे ते समजून घ्या तुम्हीं    प्रभूमय ते कसे ….१ मृत्यूचा तो विचार    कधी न येई मनी मृत्यू आहे निश्चित    माहीत हे असूनी…२ भीती आम्हां देहाची    कारण ते नाशवंत न वाटे मरूत आम्ही    आत्मा असूनी भगवंत….३ आत्मा आहेची अमर     मरणाची नसे भीती जी भीती वाटते    ती देहाची असती….४ आत्मा नसे कुणी […]

वडिलांचा आशिर्वाद

नव्हतो कधींही कवि वा लेखक     कसे घडले कांहीं न कळले साहित्य सेवेचा गुण मिळूनी     काव्य मजला सूचू लागले    १ वाङ्‍मयाविषयी प्रेम होते     वडीलांना त्या काळी अथांग ज्ञान त्यांनी मिळविले     पुस्तके वाचूनी सगळी   २ खो – खो मधल्या खेळा सारिखे     खो देत ते गेले बसूनी साहित्याची ठेव सोपवूनी मज     ते गेले चटकन निघूनी   ३ गोंधळून गेलो होतो […]

चुकीचे मूल्यमापन

चार कविता सुंदर रचिल्या,  काव्य वाचन केले त्याचे रसिक जनाची स्तुति ऐकूनी,  स्वप्न रंगविले कालीदासाचे….१, कॉलेजातील रंगमंचावरी,  तल्लीन होवूनी भूमिका केली टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली….२, जमले होते शंभर श्रोते,  भाषण ज्यांचे समोर केले श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी,  गांधी नेहरूसम होवूं वाटले…३, यश जेंव्हां पदरी पडते,  भारावूनी जातो आम्ही त्यावेळी कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन,  करीत […]

1 176 177 178 179 180 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..