श्री कृष्णाच्या हातांतील जादू

हे घनश्यामा श्रीकृष्णा

कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहना   ।।धृ।।

 

बोटे फिरवूनी मुरलीवरी

सप्तसुरांची वर्षा करी

सर्वा नाचवी तालावरी

रंगून जाती हे श्रीहरी

बोटांमधली किमया तुझी,    नाहीं कळली कुणा   ।।१।।

कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहना

 

बोटांत बोटे गुंतवी

राधेला तूं नाचवी

गोपींना तूं गुंगवी

गोपांना तू खेळवी

कशी लागते ओढ तुझी,    कळले नाही सर्वाना   ।।२।।

कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहना

 

पर्वत उचलूनी बोटावरी

वष्टी पासूनी रक्षण करी

नाचूं लागूनी गोकूळपुरी

तुझ्या भोवती ताल धरी

वाहूनी नयनांतील झरे,    व्यक्त होई प्रेम भावना   ।।३।।

कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहना

 

प्रसंग पडतां रणीं

सुदर्शन फिरे बोटातूनी

रक्षण करण्या सज्जनीं

आलास तूं धावूनी

शब्द भावना अपुरी पडतां,    वाट फुटे अश्रुना   ।।४।।

कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहना

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1596 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…