तिचा पहिला नंबर

आदले दिवशी येऊनी,  तिजला अभिनंदन दिले

पास झालीस सांगुनी,  मित्रांनी पेढे मागितले

हास्यवदन करुनी,  साखर हातीं दिली

हाती मिळतां निकाल,  पेढे देईन वदली

आंत जाऊनी खोलीमध्यें,  बंद केले दार

दुःख आवेग येऊनी,  रडली ती फार

वरचा मिळेल नंबर,  तिजला होती आशा

रात्र रात्र जागूनही,  मिळाली तिज निराशा

खूप कष्ट करुनी,  अपयश येता पदरीं

दुःख तया सारखे,  नसते ह्या संसारी

समजूनी सांगूनी तिजला, सान्तवन केले मी

पुष्कळ येतील परीक्षा,  श्रम येईल कामी

दुसरें दिवशी शाळेमध्ये,  निकाल बघण्या गेली

सर्व प्रथम नांव बघूनी,   चकीत ती झाली

होता नंबर तिचा,  तेथील गुणवत्ता यादींत

मुद्रण दोषांतील चुकीने,  पाडले तिला गोंधळांत

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1595 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…