नवीन लेखन...

चहुकडे अंधार पडलेले

चहुकडे अंधार पडलेले दुरवर नजर जात नाही आकाशी चंद्राला चांदण्या काही केल्या सोडत नाही — शरद अर्जुन शहारे

तेजोनिधीचे आगमन होते

तेजोनिधीचे आगमन होते, सोनसळी सगळे भूतल, रंग पाण्यावरती बिखरतें, फक्त मोजावे ते निव्वळ,–!!! आभाळात, दशदिशांत, ते कोठून सगळेच येतात, सूर्योदयाची संधी साधत, चहुदिशी कसे पसरतात,–!!! कुठला रंग नसतो बघावे,–? तांबडा, निळा, हिरवा, पिवळा, नैसर्गिक रंगांचे मेळ जमले, अखंड संगत ना, सूर्यदेवा ,–?!!! जशी किरणांची जादू फैलावे, बदल साऱ्या चराचरांत, उजेडाची भक्कम पकड येते, धरणीला घेत आवाक्यात,–!!! […]

मुक्तछंद काव्य

मुक्तछंद हा काव्यप्रकार मला खुप आवडतो. यमक साधता साधता काव्य सहज प्रभावी व प्रवाही होतं,नाही का? *काव्य* काही अर्थपुर्ण मुळाक्षरं गुंफित जावी अर्थपुर्ण शब्दांची तळी उचलावी त्या शब्दांतून अलंकृत रचना साधावी नटली ,सजली की तिला काव्य मैफिलीत सादर करावी दर्दी रसिकांची दाद मिळवावी दाद मिळताच मी कवी म्हणून प्रौढी मिरवावी — सौ.माणिक शुरजोशी नाशिक

दृष्टीची भ्रमंति

बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी       १   चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे      २   वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले    ३   मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला […]

निसर्ग आणि मन (चारोळी)

*निसर्ग* अद्भुत घटनांनी भरलेला कविंना वेडावून सोडणारा तुझ्या चमत्कारांनी मी भारावलेला या मानवाला गुढतेत ढकलणारा *मन* मन हे चपळ चपळ कधी इथे तर कधी तिथे मन हे उथळ उथळ कधी रडे तर कधी हसे सौ.माणिक शुरजोशी नाशिक

अरे माणसा माणसा

अरे माणसा माणसा ,नको असा अंत पाहू , जीवसृष्टी ज्यावर जगे, त्या निसर्गा नको तोडू ,–!!! अरे माणसा माणसा, जगू देत वल्ली तरु, प्राणांसाठी संजीवन असे, नको त्यास दुर्लक्षित करू,–!!! अरे माणसा माणसा, पाणियाला चल वाचवू , जलस्त्रोत जगातले सारे, वाया नको असे घालवू ,–!!! अरे माणसा माणसा, धरणीवर घाव नको घालू , काळी आई पिकवे […]

कळेना कसे जडले रे मन (गीत)

कळेना कसे जडले रे मन आज हरपले माझे रे भान।।धृ।। फुलात दिसतो,मनी हसतो क्षणात जीव उगाच फसतो मन अजुनही आहे रे सान आज हरपले माझे रे भान।।१।। घरात होतसे तुझाच भास दिलवरा श्वासात तुझी आस साद ऐकण्या आतुरले कान आज हरपले माझे रे भान।।२।। तळमळ वाढे उगाच जीवा हळहळ दाटे मनात प्रिया कंठात दाटूनी आले रे […]

दिव्यत्वाची झेप

पंख फुटता उडूनी गेला,   सात समुद्रा पलीकडे आकाशातील तारका होत्या,  लक्ष्य तयाच्या नजरेपुढे निसर्गाने साथ देवूनी,  दणकट दिले पंख तयाला झेप घेत जा दाही दिशांनी,  मनी ठसविले त्या पक्षाला आत्मविश्वास तो जागृत होता,  चिंता नव्हती स्थळ काळाची कुठेही जाईन झेपावत तो,  ओढ तयाला दिव्यत्वाची निसर्ग रंगवी चित्र मनोहर, रंग एक तो कुंचल्यामधल्या देईन अंगच्या छटा निराळ्या, […]

दुरावा

भारत भूच्या सीमेवरी लढण्या सैनिक असावा मनामध्ये नसावा कधी घरच्यांसाठी रे दुरावा देशाचे रक्षण करणे माझे हे कर्तव्य पहिले दुराव्यातही जवळीक ह्यातच हित रे आपुले भारत मातेचे शिपाई त्यांचे घरटे गावदेशी माता- पिता ,पत्नी-मुलांची बांधिलकी असे मनाशी नकोच खंत दुराव्याची नातीच अपुली प्रेमाची जाणीव देश रक्षणाची चिंता नाहीच दुराव्याची — सौ माणिक शुरजोशी नाशिक

1 150 151 152 153 154 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..