नवीन लेखन...

किती राहिले अंतर

किती राहिले अंतर,आपुल्या मनामनात, पडला केवढा दुरावा, दोघांच्याही काळजात, — कित्येक योजने तू दूर, हाक तेथून मारतोस, मुक्या मनातील आर्त, उगीच का छेडतोस,—!!! दूर जाता, जवळ अधिक, नियतीचा का असे डांव, उभा राही पेचप्रसंग, प्रेमिकांना मात्र घांव,–!!! उलते सारखी जखम, बरी,तरीही बंबाळ, कल्पनांना बसे छेद, वास्तवाचीच जळजळ, –!!! गलबले आत जीव, वाटते तुझीच ओढ, एकदा तो […]

स्वभाव मालिका

रक्तातुनी गुण-दोष उतरतो,  वंश परंपरेने व्यक्तीतील स्वभाव धर्म,  जाणता येतो रक्ताने…१, मनांतील विचार मालिका,  कृत्य करण्या लाविती सभोवतालच्या परिस्थिती रूपे,  रक्ताला जागविती…२, कर्म फळाच्या लहरींना,   रक्त शोषून घेई, ह्याच गुणमिश्रीत रक्तामधूनी,  बिजे उत्पन्न होई….३, बिजांचे मग रोपण होवूनी,  नव जीवन येते स्वभाव गुणांची मालिका,  अशीच पुढे जाते…४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

प्रीतफुलां, रे प्रीतफुलां

प्रीतफुलां, रे प्रीतफुलां, सुगंध तुझा घमघमला, भरभरून ओंजळीतला, दरवळ हृदयाने सामावला,–!!! तन-मन सुगंधित होता, कायापालट पाहता पाहता, क्षण -क्षण आनंदात विचरला,— पाकळी पाकळी तुझी फुलतां,–!!! उत्साही लहरी उफाळता, अणू रेणू सारे रोमांचता, लाजून गेली रुपगर्विता, तरल भावना-कल्लोळ उठला,-! आठवण त्यांची येता, मन मोर थुईथुई नाचला, अशा भावविभोर चित्ता, जीव कुरवाळीत राहिला,—!!! आजमितीस काळ न आला, सुवर्णकणांनी […]

पाप वा पूण्य काय ?

काय पूण्य ते काय पाप ते,   मनाचा हा खेळ जाहला ज्यास तुम्ही पापी समजता,   कसा काय तो तरूनी गेला….१,   कित्येक जणाचे बळी घेवूनी,   वाल्या ठरला होता पापी मनास वाटत होते आमच्या,   उद्धरून न जाई कदापी….२,   मूल्यमापन कृतिचे तुमच्या,   जेव्हा दुसरा करित असे, सभोवतालच्या परिस्थितीशी,  तुलना त्याची भासत असे…..३   तेच असते पाप वा पुण्य,  […]

बालकविता – ससेराव, ससेराव,

बालकविता ससेराव, ससेराव, निघालात कुठे , चांदोबावर स्वार अगदी भल्या पहाटे,–!!! भोवती किती ढग, वाजत नाही का थंडी, अंगात तुमच्या लुसलुशीत , पांढरी पांढरी बंडी,–!!! ससोबा ससोबा, कान करून उभे, वटारून आपले डोळे, बघता काय मागे,–!!! तुमच्यासंगे हरिण, आज नाही का आले, का छोट्या बाळागत, आईच्या कुशीत झोपले,–? ससेराव ससेराव, भीती वाटते मला, हलता हलता चंदामामा, […]

जीवन प्रवासी

तुझ्या घरि आले विसंबूनी,  तव प्रेमाचे पडतां बंधन सात पाऊले टाकीत टाकीत,  सोपविले तव हातीं जीवन सरितेमध्ये नौका सोडली, वल्हविण्या तव हाती दिली घेवूनी जा ती नदी किनारी, अथवा डुबूं दे ह्याच जळी ऋणानुबंधाच्या ह्या गांठी,  बांधल्या गेल्या पडतां भेटी जन्मो जन्मीचा प्रवास सारा, पुनरपि चाले यौवन काठी असेच जाऊ दोघे मिळूनी, कांही काळ तो एक […]

रंग निळ्यासावळ्या घनांचा

रंग निळ्यासावळ्या घनांचा, आज आभाळी पसरला, जसा विविधरंगी मुलामा, नभांगणाला कुणी दिधला, — दिनकर उगवला जसा , रंगांचे अगदी पेंव फुटतां, नभी जादू -ई खेळ चालला, जो पाहे तो चकित जाहला,–!!! सोनेरी, पांढरट, निळा, काळा जांभळा, पिवळा, रंग सज्ज भास्कर-स्वागतां, जणू विजयोत्सव साजरा,– मित्रराज डुलत येता, गडगडाट झाला ढगांचा, मेघमल्हार कोणी गायला , कल्लोळ उठला पहा […]

श्रीकृष्णाचे जीवन : बनली एक गाथा

श्रीकृष्णाचे जीवन   बनली एक गाथा यशस्वी होई तुमचे जीवन   चिंतन त्याचे करिता    ||१|| तल्लीनतेच्या गुणामध्यें   लपला आहे ईश्वर तल्लीनतेचा आनंद लुटा    शिकवी तुम्हा मुरलीधर    ||२|| बालपणीच्या खेळामध्ये   जमविले सारे सवंगडी एकाग्रतेने खेळवूनी    आनंद पदरीं पाडी    ||३|| मुरलीचा तो नाद मधूर    मन गेले हरपूनी डोलूं लागले सारे भवतीं    मग्न झाल्या गौळणी    ||४|| टिपऱ्या घेवूनी नाच नाचला    गोपी […]

हिरव्या पानात लगडलो

हिरव्या पानात लगडलो, पांढऱ्या शुभ्र मोगरी कळ्या, एकेकच हळूहळू जन्मतो, स्वभाव धर्मानेफुलणाऱ्या, गोऱ्या रंगावरी आमुच्या, जनहो नका हो भाळू, टपोरेआकार पाहुनी, मोहून नका हो हाताळू, कौमार्य फुलते आमचे, दुरुन बघावे, हेच उचित, मुसमुसत्या तारुण्याला, ठेवा तुम्ही अलगद, मगच उमलेल फूल हे सुंदर , येईल मोगऱ्याला बहर, स्पर्श न करता नेत्रसुख घेता, घ्या हो आमुचा आस्वाद, किती […]

मशाल

श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर  । विविध नामे परि,  दुर्बलांची करण्या कामे  ।१। अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी  । दैवी शक्ती अंगी,  अंधारी चमकली ठिणगी  ।२। मशाल घेवून हाती,  आला धावत पुढती  । अति वेगाने, सर्वांची उजळीत मने  ।३। कर्म योग आणि भक्ती,  ह्या तीन ईश्वरी शक्ती  । एकत्र जाहल्या,  मशालीत त्या समावल्या  […]

1 152 153 154 155 156 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..