नवीन लेखन...

या कातरल्या क्षणांना

या कातरल्या क्षणांना,सय तुझी येते,– उन्हाची तप्त काहिली, चटकन् दूर होते, वारा धुंद वाही, ढग जाती प्रवासी, अधूनमधून बिजलीही, उगा आपुले दर्शन देई, अशा वेळी आठवे मज, सोनेरी प्रभेची सांज, याच समुद्रकिनारी, वाजली मिलनाची गाज, नभ सुंदर सोनबावरे, होते भेटीस साक्षी, कूजन करीत बागडती, पक्षी आनंदें वृक्षी, किनारा दूरवर तटस्थ, उभ्याने राखी सागराला, मिलनाची किती उदाहरणे, […]

 देह एक बदलणारे घर

बदलीत गेलो घरे मी माझी,  आज पावतो कितीक तरी  । पोटासाठीं नोकरी करतां, भटकत होतो आजवरी  ।। बालपण हे असेंच गेले,  फिरता फिरता गावोगावी  । वडिलांची  नोकरी होती,  धंदा करणे माहीत नाही  ।। पाऊलवाट तीच निवडली,  मुलाने देखील जगण्यासाठी  । तीन पिढ्या ह्या चालत राही,  एका मागून एकापाठी  ।। गेले नाहीं आयुष्य सारे, स्थिर राहूनी एके […]

चंद्र- ग्रहण

राहू केतुनो सोडून द्या तुम्ही,       मगरमिठीतून चंद्राला बघा बघा ह्या प्रथ्वीवरती,        काय तो हा: हा: कार मजला   प्रेमिजानांचा प्रेमबिंदू तो,        सौंदर्याचा मुकुटमणी झाकळला सारा नभात हा,      म्हणती त्यास गिळला कुणी   आत्मा जाता सोडून देहा,       उरे न कांही मागे चंद्र चांदणे नभात नसता,       सौंदर्याची मिटतील अंगे   सौंदर्यातची  बघतो सारे,       जगण्यासाठी सौंदर्य हवे विश्वचक्र हे फिरत रहाण्या       चंद्राचे आस्तित्व सतत हवे   नष्ट होतील जीवजीवाणू,      आनंद त्यांचा जाईल विरुनी बलिदानाच्या पुण्याईने परि        सुटेल चंद्र मगरमिठीतून   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

निनावी गुरू

नव्हतो कधीही चित्रकार,  परि छंद लागला रंगाच्या त्या छटा पसरवितां,  मौज वाटे मनाला…१, रंग किमया बदण्या नव्हता,  मार्गदर्शक कुणी गुरुविना राहते ज्ञान अपूरे,  याची खंत मनी…२ नदिकाठच्या पर्वत शिखरी,  विषण्ण चित्त गेलो मन रमविण्या कुंचली घेवून,  चित्र काढू लागलो…३ निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य,  रंग छटा शिकवी गुरू सापडला चित्र कलेतील,  हाच तो निवावी….४   डॉ भगवान नागापूरकर […]

कर्ममुक्ती

न राही तुमचे ते कर्म,  ज्यात प्रभू इच्छा अंतीम….१, प्रत्येक घटनेचे अंग,   त्यात मुख्य ईश्वरी भाग….२ तुमच्या मार्फतच होई   त्याचा इशारा कोण पाही….३, सर्व समजे मीच केले   अहंकाराने मन भरले….४, षडरिपू असे साधन   खेळविता यावे म्हणून…५, राग,लोभ, मोह मायादी   ठेवती वाटते आनंदी….६, परि याच्याच शक्तीने   प्रभू खेळ चाले युक्तीने….७, षडरिपू सारे टाळून   मुक्ती मिळेल खेळातून…..८   […]

गारवा थंडीचा

सकाळी गारवा थंडीचा किलबिलाट घुमतो पक्षांचा सखी गुथलेली कामात रुणुझुणुतो ताल पावलांचा @ शरद शहारे वेलतूर

मन अथांग सागर

मन अथांग सागर, उफाळत्या लाटांचा, मन आवर्तनी भोवरा, सखोल पाणथळाचा, –||1|| मन बिंदूंचे अवकाश, विस्तीर्ण मन पसरट, भावनांचे उठती कल्लोळ, अतुल आणि अलोट,–||2|| मन पाण्याचा डोंगर, एकावर एक पार, शुभ्रतम* भासे चढ, *निळसर पण उतार,–||3|| मन किरणी प्रभाव, झेलत साऱ्या दिनभर, सोनेरी कलत, झुकत, आभाळ उदंड त्यावर,–||4|| मन समुद्री वादळ, वारे अखंड वाहत, जीवाची नौका चालण्या, […]

आठवण

अनामिक जे होते पूर्वी,  साद प्रेमाची ऐकू आली योग्य वेळ ती येतां क्षणी,  हृदये त्यांची जूळूनी गेली शंका भीती आणि तगमग,  असंख्य भाव उमटती मनी, विजयी झाले ऋणाणू बंधन,  बांधले होते हृदयानी, उचंबळूनी दाटूनी आला,  हृदयामधला ओलावा स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा मनी वसविल्या घर करूनी,  क्षणीक सुखांच्या आठवणी जगण्यासाठी उभारी देतील,  शरीर मनाच्या […]

गांधी….आबे समजून त घ्या आंधी।

मुके बसा कायी सांगु नोका मायीत हाये आमाले। गांधी बाबा चा..किती.. पुळका हाये तुमाले। कायी सांगु नोका.. ते गांधी बाबा चे तीन माकडं। तुमचं न त्यायचं त भल्ल हाये वाकडं। बस झाले तुमचे ते सूत अन चरखे। मायीत हाये..गांधीजी किती आपले न परके। कायी सांगू नोका..की गांधीजी हात नोटावर। रोज लावता थुका… घेऊन दोन बोटावर। कायी […]

आईच्या संगत बसलो उन्हात

आईच्या संगतबसलो उन्हात, बाहेर उबेत, थंडी घरात, सकाळचा प्रहर, जीवास आराम, नाही काम धाम, बसलो निवांत, बागेच्या फाटकात, अवधान ठेवत, आईचे संरक्षण, मग काय वाण-? मला ते मिळत, मी निर्धास्त,–!!! आई बिनधास्त, नाही डरत, लोक घाबरत, मी हसत,–!!! कवडसा उन्हात, त्यात खेळत, जरासा थकत, आईस बिलगत,–!!! © हिमगौरी कर्वे

1 153 154 155 156 157 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..