नवीन लेखन...

रवि – उदयाचे स्वागत

उठा उठा हो सकळजन स्वागत करु या रविउदयाचे फूलून जाते जीवन ज्याने त्या सूर्य आगमनाचे   //धृ//   उषाराणीची चाहूल येता चंद्रतारका ढळल्या आतां चराचराना जागे करण्या चाळवी निद्रा हलके हाता वंदन करु या लिन होऊनी चरण स्पर्शुनी उषाराणीचे    //१// स्वागत करुया रविउदयाचे   रंगबेरंगी सुमने फुलली वाऱ्यासंगे डोलू लागली दरवळूनी तो सुगंध सारा वातावरणी धुंदी आणली […]

बेलगाम

प्रेम , जिव्हाळा, मातृत्वाचा, त्रीलोकाचा संगम तूं, का गं चिरडतेस ओळख आपलीं, स्त्री सामर्थ्याची जनकही तूं ! बेलगाम स्वातंत्र्य आलें पदराला, पदर विसरूनी गेलीं तूं, संस्कारांची प्रसूती केलीस, विटंबनाही केलीस तूं ! लाज मानेला, लचक कमरेला, दुर्गामातेचा अंक्षही तूं, शतक बदलले , काळ बदलला, लाजेलाही लाजवलेस तूं ! जगत जगाची कारभारीन, भुमातेचा कंठमनी तूं, सारेच सोडूनी […]

का असे जगणे होते

का असे जगणे होते,भलतेच कधी जीवघेणे, वेदनांचे उठती टाहो, आक्रंदनांचे तीव्र हिंदोळे, सहावे कुठवर, सोडून द्यावे, जखमी घायाळपण लपवावे, कोण त्राता, कोण करविता, संभ्रमी सारे जीव पडावे, अगदी अनाकलनीय ना, आपल्या आयुष्याचे कोडे , त्यातून कशी केव्हा सुटका, प्रारब्धाचेच खेळ सारे,–!!! संयम, नि संतुलन किती, जागोजागी का दाखवावे, माणूस म्हणून जगणे मग, शेवट यंत्रवतच”” बनावे, — […]

सदैव नामस्मरण

प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा  । ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा  ।। चमत्कार दिसून आला एके दिवशी  । राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी  ।। विज्ञानाने उकल केली या घटनेची  । खात्री करिता सत्यता पटली याची  ।। चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे  । त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे  ।। शब्दांचे वलय फिरती देहाभोवती  । […]

तारकांचे पुंज माळून

तारकांचे पुंज माळून, वाटते तुझ्या कवेत यावे, दुःखांच्या आभाळीही, मुक्त बघ जरा हिंडावे,–!!! घायाळ जीव तो आंत आंत, तो कोणा कसा कळावा,-? आत्म्यानेच आत्म्याला, दिलासा कसा कुशीत द्यावा,–!! ओढ नसावी शरीरातून, असावी प्रीत मनामनांची, धागे एकमेकांत गुंफत, वीण गुंतावी काळजांची,–!!! तुझे दुःख माझ्या उरात सले, माझे व्हावे ना रे तुझे, अश्रू माझे गाली सांडताना, राजा,अंतर मात्र […]

चिमण्यांनो शिकवा

चिव् चिव् करित बोलतां तुम्ही सारी भाषा दोन स्वरातून विचारांना देत असता दिशा शब्द आमचे सप्तसुरांतून येती बाहेरी व्यक्त करिती भाव सारे असती जे अंतरी दोन अक्षरी किमया सारी तुमच्या भाषेची त्याच चिव चिवे समजुन घेता धडधड ह्रद्धयाची भाव मनीचे टिपून घेण्या शब्द लागती थोडे चेहऱ्यावरल्या हलचालीनी प्रश्न उकलूनी पडे. समज तुमची आपसांतली कौतूक करणारी शब्द […]

व्यसनासक्ति विषयी !

दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द, लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद ।।१।। अजगराच्या विळख्याहूनी, महाभयंकर सत्य, एक नव्हे, अनेक सारे, नष्ट होतील त्यांत ।।२।। होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी, नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी ।।३।। जाणूनी घ्या त्या शत्रुला, छुपा रुस्तूम तो, प्रवेश एकदा शरिरीं मिळतां, कायमचा तो राहतो […]

आत्मविश्वास

जे जे मजला हवेच होते,  मिळवित गेलो यत्न करूनी चालत असता जेव्हा पडलो,  उठलो होतो धीर धरूनी आतंरिक ती शक्ती माझी,  पून्हा पून्हा तो मार्ग दाखवी शरिराला ती जोम देवूनी,  वाटेवरती चालत ठेवी, निराश मन हे कंपीत राही,  विश्वालासा तडे देवूनी दु:ख भावना उचंबळता,  देह जाई तेथे हादरूनी परि विवेक हा जागृत होता,  विश्लेषन जो करित […]

थेंब

जलबिंदू इवलासा आवडतो हा फारसा नभात तो दावतोना इंद्रधनू शोभतोना थेंबातूनी जाता तेज दिसतसे रंग शेज कधी दिसे मज मोती कधी वाटे हिरा किती पहाटेस दवबिंदू रुप घेई जलसिंधू हिमालयी हा गोठतो क्षणार्धात बर्फ होतो द्रव स्थिती वायू स्थिती थेंबा तुझी जलस्थिती — सौ.माणिक शुरजोशी नाशिक

गोठ्यातील अमृत

एके दिवशी प्रात:काळी,  क्षीरपात्र घेवून हाती धेनूचे ते दूध आणावया,  गेलो गोठ्यावरती बघूनी तो अवाढव्य गोठा,  चकित झालो गाई वासरातील प्रेम देखूनी,  मनी आनंदलो गवळ्यांची धावपळ, चालली गोठ्यामध्ये त्या चारा, कडबा गवताच्या,  गंजी तेथे होत्या अधूनी-मधूनी कुणीतरी, झाडती कचरा शेण मातीचा होई तेथे,  सतत पसारा उग्र दर्प दरवळत होता, त्या परिसरी कोंदटलेले वातावरण उबग आणि उरी […]

1 148 149 150 151 152 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..