नवीन लेखन...

बागेतल्या तारका

बागेमधला निसर्ग सारा          टिपत होतो मी रात्र पडूनी चंद्र आकाशी          बाग झाली रिकामी      १   बाकावरती बसून एकटा          मोजत होतो तारे लुकलुकणारा प्रकाश तो            अंक चुकवी सारे           २   अगणित बघुनी  संख्यावरी     प्रसन्न झाले मन किती वेळ तो निघूनी गेला        राहिले नाहीं भान         ३   शितलेतेच्या  वातावरणीं           शांत झोप लागली नयन उघडतां बघितले मी      पहांट ती झाली           ४   गेल्या निघूनी सर्व तारका       आकाशाला सोडूनी शोधूं लागले […]

या कातरल्या क्षणांना

या कातरल्या क्षणांना,सय तुझी येते,– उन्हाची तप्त काहिली, चटकन् दूर होते, वारा धुंद वाही, ढग जाती प्रवासी, अधूनमधून बिजलीही, उगा आपुले दर्शन देई, अशा वेळी आठवे मज, सोनेरी प्रभेची सांज, याच समुद्रकिनारी, वाजली मिलनाची गाज, नभ सुंदर सोनबावरे, होते भेटीस साक्षी, कूजन करीत बागडती, पक्षी आनंदें वृक्षी, किनारा दूरवर तटस्थ, उभ्याने राखी सागराला, मिलनाची किती उदाहरणे, […]

ध्यानस्त शिव

शिव कुणाचे चिंतन करितो ? प्रश्न पडला मनी, तोच तर आहे प्रभू जगाचा काय तयाचे ध्यानी…१,   जेव्हां आम्ही चिंतन करितो, ध्यान लावी प्रभूकडे, प्रयत्न करूनी जगास विसरे, लक्ष केंद्रितो त्याजकडे….२,   उलट दिशेने शिवाचे चिंतन, चालते जगतासाठीं ध्यानामध्यें स्वतःसी विसरे, लक्ष्य त्याचे इतरांसाठीं ….३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

भाषा जिला गौरवते

भाषा जिला गौरवते,त्या मातीचेच गान , मातेहूनही ती मोठी, भाषा देतसे अधिक वेलांटी,! ती आहे सृजनांत , सर्वांची काळी आई, तिच्या कुशीतून जन्म घेतो, आपण सारे, पक्षी, प्राणी, –! ती करते जसे संगोपन, जिवांचे नित्य जतन, म्हणूनच तिला रोज करावा, नेमाने आपण प्रणाम,—! काय तिची महती वर्णावी, कणातही आहे सत्व, जीवनातील संजीवनी, तिच्याविना सृष्टी निर्जीव,–! जोडीदार […]

शबरीचे निर्मळ प्रेम

ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   ।।धृ।।   व्याकूळ होती राम भेटी रात्रंदिनी नाम ओठी नाचूनी गाऊनी भजन करी   ।।१।। ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   बोरे जमवित चाखूनी वेचली अंबट तुरट दूर फेकली भोळ्या भक्तांची प्रभू कदर करी    ।।२।। ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   उष्टी बोरे प्रभू चाखती शोषूनी त्यातील रसभक्ती शबरी […]

मौलीक शब्द

भावमनीचे उमटूनी पडती ज्याचे सहवासे काव्यामधला ईश्वर मजला तोच परि भासे शब्द तयाचे ऐकत असता मन येते भरूनी शब्दांना त्या बांध घालता काव्य पडे उमटूनी अनूभव ज्याचा वदला जातो कंठा मधूनी भोगलेला असे परि तो एके काळी त्यांनी सत्य सारे तेथे असता दिव्यत्वाची जाण म्हणूनच पटते मनास तेंव्हां हेच खरे जीवन वाचित गेलो धर्मामधूनी जे जे […]

आज मज कळो यावे

आज मज कळो यावे,का रिकामे आपुले आभाळ, अनभिषिक्त प्रेम चांदणे, नाहीसे का आज ओढाळ,–!!! मंदमंद प्रेम प्रकाश, हळूहळू नाहीसा होई, जीवनीचा तम मग, बघ, कसा वाढत जाई,–!!! रोज रोज अमावस, असे कसे चालायाचे, रात्रंदिनी निष्प्रभ खास, चंद्र – चांदणे मज भासे,—!!! अनुभवल्या जिथे पोर्णिमा, चंदेरी धवल लख्ख, तेच प्रेमाभाळ वाटे, धूसर तममय मख्ख,–!!! कुठे गेला माझा […]

पूर्णेच्या परिसरांत !

जेंव्हा ठरले गावी जाणे हूर हूर होती  मनी बराच काळ गेला होता आयुष्यातील निघुनी काय तेथे असेल आता सारे गेले बदलूनी काळाच्या प्रवाहामध्ये राहिलं कसे टिकूनी चकित झालो बघुनी सारे जेथल्या तेथे उणीवता न जाणली क्षणभर देखील मानते बालपणातील सवंगडी जमली अवती भवती गतकाळातील आनंदी क्षण पुनरपि उजळती आंबे चिंचा पाडीत होतो झाडावरती चढुनी आज मिळाला तोच आनंद झाडा खालती बसूनी मळ्यामधली मजा लुटली नाचूनी गाऊनी विहिरीमधल्या पाण्यात मनसोक्त ते डुबूनी ऐकल्या होत्या कथा परींच्या तन्मयतेने बसूनी आज सांगे त्याच कथा मी काका मुलांचे बनुनी वाडा सांगे इतिहास सारा पूर्वज जगले कसे भव्य खिंडारी उमटले होते कर्तृत्वाचे ठसे बापू, आबा, मामा, काका, मामी वाहिनी जमती कमी न पडली तसूभरही प्रेमामधली नाती मीही बदललो, गांवहीं […]

घड्याळ

घड्याळ होते भिंतीवरती टिक टिक करुन चाले सतत दिसली चाल काट्यांची एकाच दिशेने हाले   धावत होता एक तुरु तरु दुजा हळूच धांवे छोटा जाड्या मंद असून पळणे ना ठावे   पळत असती पुढे पुढे समज देती काळ-वेळेचा किती राहील शिलकीमध्ये प्रवास आपुला जीवनाचा   जीवन चक्रापरि फिरती घड्याळ्यामधले सारे काटे जाणीव करुन देती सतत आपण […]

आला, आला, आला

आला, आला, आला,— $$$$बघा, बाप्पू चिवडेवाला,—-, या मुलांनो, या तायांनो, या दादांनो,या बायांनो, या मित्रांनो, या बाप्यांनो, लवकर सगळे, पटपट या, आला,आला,आला, बाप्पू चिवडेवा$$$$ला,$$$ —- माझ्या चिवड्याची गंमत न्यारी, लई, लई लज्जतदार, खुमारी””’ही भारी,—!!! तळलेले शेंगदाणे, अन् खोबऱ्याचा चुरा,—-!!! आला, आला,आला,— तिखट नाही, तेलकट नाही, आहे कसा खुसखुशीत, तोंडात जरा टाकून पहा, जीभ होईल रसरशीत, सुटेल […]

1 147 148 149 150 151 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..