नवीन लेखन...

रंगाच्या उधळूनी लाटां

रंगाच्या उधळूनी लाटां, नाचल्या किती गोपिका, आज पंचमी, रंगात नाहली, विलक्षण गोकुळाची कळा,|| श्रीहरी नावातच हिरवा, निळा रंग गगनाचा, आभाळभर पसरलेला, रंग शोभे तो निळ्या’चा, अस्तित्त्व’ त्याचे आसमानी, आणि सखाहरी तो धरणीचा,|| २ || गोपिका आज नाचल्या टाकुनी सगळ्या बंधना जिवाशिवांचे’ बनले ”अद्वैत””, विसरून साऱ्या तनांमनां, कृष्णा’सम तो कोण सवंगडी, मिळेल त्यांना नेमका,—??? रंगवुनी टाकती, भान […]

आयुष्य वाया घालू नका

दवडू नका आयुष्य तुम्ही,  वेळ घालूनी असा तसा, पदरी येई निराशा तुमच्या,  गेला क्षण येईल कसा….१, मर्यादेतच जीवन असूनी,  गतीमान असते बघा, स्वत: भोवती केंद्रीत होता,  कसे जाणाल इतर जगा….२, ईच्छा असते वाया न जावे,  आयुष्य सारे विनाकारण, हर घडीला विचार असावा,  इतरांसाठी असते जीवन….३, जेंव्हां तुम्ही सेवा करीता,  इतर मनाचे भाव जाणूनी, तेच अर्पण होत […]

 पुजारी – पुरोहित

पुजारी मंडळींचा कारभार, जगदंबेच्या नांवें चालतो  । भाविकामधील अज्ञानाचा,  उपयोग करूनी घेतो  ।।१ पूजेमधल्या विधी करिता,  आग्रह त्यांचा चालत असे । भक्तीरसाचे महत्त्व असूनी,  त्याच्यांत त्यांना रस नसे  ।।२ व्यवहारीपणाचे रूप आणूनी,  बाजारी वृत्ति दाखविती । धर्माचे नाव लावूनी,  भोळ्या भक्तांना लुटत असती  ।।३ पुरोहित असा असावा,  धर्माची करि उकलन । भक्तीमार्गाच्या वाटसरूंना,  योग्य मार्ग  देयी […]

प्रभाते नाम घ्या जगदंबेचे

प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   ।।धृ।।   कांहीं काळासाठीं नव्हता जगाचे पाठीं कोठे तुम्हीं होता न कळे आठवता जाग येऊनी मिळाले   भांडार आठवणींचे   ।।१।। प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   विश्रांतीचा काळ हा शांततेने गेला पहा देह मनाची धावपळ थांवली कांहीं काळ पुनरपि लागते सर्वां   चैतन्य जीवनाचे   ।।२।। प्रभात झाली […]

अंबेस दाखवी काव्य

पाटीवरती अंक लिहीले,  बागडूं लागला आनंदाने पित्याचे लक्ष वेधण्या,  हनवटी खेची हातानें….१, प्रथमापासूनी लक्ष पित्याचे,  होते अवखळपणाकडे अजाणपणा दाखवोनी,  दुर्लक्ष करी मुलाकडे…२, शब्दांची गुंफन करूनी,  कवितेचा संग्रह केला तोच संग्रह घेवून चाललो,  दाखविण्या माहूरी रेणूकेला…३, जगदंबा ही आदी शक्ती,  सारे तिजला ज्ञात असते अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते…४, पाटीवरले अंक बघूनी,  हृदय पित्याचे […]

असे कसे विसरलास

असे कसे विसरलास,आपुल्यातील गोड नाते, माझे,होते ना तुझे, तुझे असायचे रे माझे,–!!! जीव तुझा कासावीस, होई मला उलघाल, मनाचे सोड, तनाचे, मग सोसते हाल-हाल,–!!! प्रीतीची हूल तुझ्या, कशी गावीही नाही,— बनशी असा रुक्ष की, प्रेमाचा लवलेशही नाही,–!!! तरल, मृदू, नाजूक, प्रीत पुन्हा कधी फुलेल, शेजेवरील मोगरा, पुन्हा कधी बहरेल,-? तारुण्याचा बहर आपुला, ओसरला नाही पुरता, तरीही […]

योग्य वेळी

दिन दुबळे रोगी जर्जर,  कितीक पसरले या संसारी काटे काढूनी जीवनावरचे,  सुगंध घ्या कुणीतरी….१ शून्यामधले कितीकजण,  शून्यची सारे अवतीभवती परिस्थितीच्या वणव्यामध्ये,  धगधगणारे जीवन कंठती….२ आज हवे त्यांना कुणीतरी,  फुंकार घालील दु:खावरती सहानुभूतीचा शब्द,  निर्माण करील सहनशक्ति….३ क्षीण होता दृष्टी,  दिसेल कां धडपड श्रवणदोष येण्यापूर्वी,  ऐकून घे दु:खी ओरड…४ चपळ सारे अवयव असता,  धावपळीचे जीवन बघ तू […]

आनंदी भाव हाच भगवंत

गेले सारे आयुष्य    परि न कळला ईश इच्छा राहिली अंतर्मनीं    प्रभू भेटावा एके दिनीं  ।।१ बालपणाचा काळ    करुनी अभ्यास नि खेळ मनाची एकाग्रता     केली शरीरा करिता  ।।२ तरुणपणाची उमेद    जिंकू वा मरु ही जिद्द करुन प्रयत्नांची पराकाष्टा    बनवी जीवन मार्ग निष्ठा  ।।३ संसारातील पदार्पण    इतरासाठी समर्पण वाढविता आपसातील भाव    जाणले इतर मनाचे ठाव  ।।४ काळ येता […]

जखमी होऊन पिल्लू पडले

जखमी होऊन पिल्लू पडले, घायाळ, केविलवाणे, करुण आवाजी साद घाले, आईस बोलावे सारखे, पक्षीण भोवती घिरट्या घाले, चोचीने त्यास गोंजारी, कळेना तिला काय जाहले, कसे पडले ते खाली ,–? करूण साद ती ऐकून कोणी, धावत आला दयावंत, अती गरीब असूनही, पक्षिणीस भासे देवदूत, हळुवार हाते पिल्लाला, जवळ घेऊन कुरवाळी, साशंक मनाने पक्षीण मात्र, सारखी हिंडे भोवताली, […]

ज्ञान देणारे सर्वच गुरू

अवतीभोवती सारे तुझ्या,   आहेत गुरू बसलेले जाण तयांची येण्यासाठी,   प्रभूसी मी विनविले  ।। १   निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी,   काही तरी असे गुण आपणासची ज्ञान असावे,   घेण्यास ते समजून  ।।२   उघडे ठेवूनी डोळे तुम्ही,   बघाल जेंव्हां शेजारी काही ना काही ज्ञान मिळते,   वस्तूच्या त्या गुणापरी  ।।३   सारे सजिव निर्जिव वस्तू,   गुरू सारखे वाटावे तेच […]

1 146 147 148 149 150 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..