तू असा, तू तसा
तू असा, तू तसा, तू कायसा, कायसा, अनंत रुपे भगवंता, घेतोस कशी रात्रंदिवसा,–!!! कधी वाऱ्याचा स्त्रोत तू, कधी, खळखळणारे पाणी, कधी खोल खोल दरी तू, कधी कोकिळकंठी मंजूळगाणी,-!! शोधावे कुठे तुला, तळ्याकाठी, झऱ्याजवळ का धबधब्यात, सोनेरी उन्हात राहशी, का डोंगरातील कपारीत,–!!! बाळाच्या हास्यात दडशी, का अंधारल्या गुहेत, प्राण्यांच्या दिमाखी बघावे, का पक्ष्यांतील सौंदर्यात,–!! जगातील आश्चर्यात पहावे, […]
