नवीन लेखन...

विनाश – ईश्वरी व मानवी

संतुलन  करूनी चालवी,  निसर्गाचा खेळ सतत  । जन्ममृत्यूची चाके फिरवी,  एकाच वेगाने अविरत  ।। जन्म घटना ही शांत होता,  मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी  । नष्ट होतो जेव्हां मानव,  विचार लाटा उठती मनी  ।। मरणामध्यें निसर्ग असतां,  हताश होऊनी दु:ख करी  । मानवनिर्मित नाश बघूनी,  घृणायुक्त  येई शिसारी  ।। पूर वादळे धरणी कंप,  पचवितो आम्ही ही […]

लोंबकळलेल्या खाली शेपट्या

लोंबकळलेल्या खाली शेपट्या, पिल्लू मौज करे कशी,–? शोधक बुद्धी, चौकस नजर, अफलातून फळते अशी,–!!! युक्ती,शक्ती, बुद्धी, जिवाला आहे देणगी,—- सदुपयोगाने करा किमया, जगण्यात गंमत मोठी,–!!! दिसे पिल्लू छोटेसे,— तरी मस्त आहे कल्पनाशक्ती, आरामात कसे झोके घेई, दुनियाच भासे त्यास छोटी,—!! डोळे मिचकावत पिल्लू बघते, आजूबाजूच्या साऱ्या सृष्टीकडे, भरभरून लुटेन आनंद मी, सोडवेन अनवट निसर्ग कोडे,-! ©️ […]

निसर्ग व्याप्ती

उंच चढूनी हिमालयी,      झेंडा तो रोविला गीरीराजाचे शिरावरी,      विजय संपादिला   उंचाऊनी  बघे मानव,      अथांग जगताला विज्ञानाच्या जोरावरती,   अंतराळात गेला   युगा युगाचा चंद्रमा,       केला अंकित त्याने त्याच्या देही ठेवी पाऊल,   मोठ्या अभिमानाने   अगणित दिसती गृहगोल,      त्याचा दृष्टीला सीमा न उरली आता मग,      चौकस बुद्धीला   चकित होतो प्रथम दर्शनी,      विज्ञाना बघता दिसून येती अनेक गुढे,    एक एक उकलता   किती घेशी झेप मानवा,       उंच उंच गगनी वाढत जातील क्षितिजे,     तितक्याच पटींनी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

चालला घेऊन तो

चालला घेऊन तो, श्रीरामाला वनवासाला, नौकानयन करत करत, पाण्यातील प्रवासाला, नौका चालवे नावाडी, नदी तरुन जाण्या, श्रीरामासंगे जानकी, लक्ष्मण रक्षण करण्या, त्रिकूट’ चालले जलप्रवासा, जसे ओलांडती भवंसागरा,–!!! नावाडीच श्रीराम ते, संसार सागरातून तारण्या,–!! प्रवासीच इथे खरा नावाडी, अन् नावाडी असे प्रवासी, संसार सागर उफाळतां, नावाड्याचे कसब पणाशी,–!! हिमगौरी कर्वे.©

छुन्नुक छुन्नुक (दोन शब्दी)

छुन्नुक छुन्नुक, पैंजण वाजती, थिरक थिरक, पावले नाचती, प्रेक्षक आपुले, भान विसरती, नृत्याच्या तालावरी,—- रेषेला मिळे, रेषा आणखी, कसब आपुले, चित्रकार दाखवी, प्रतिमा काढे, कशी हुबेहूब, बोटांची जादुगिरी,—- कंठातून मंजुळ, सुस्वर निघती, मधुर गायने, मंत्रमुग्ध होती, तालबद्ध गाणे, गायिका गाई,—- सहजसुंदर अभिनयाची, श्रेष्ठ अदाकारी, पाहून सर्वांचे, डोळे पाणावती, नाट्यकला आगळी,—- अन्न सुग्रास, सुगरण पकवी, चोचले जिभेचे, […]

 प्रभूची खंत

मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।१।।   शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना, लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला मना  ।।२।।   तूच दिसला पुंडलीका, आई-बापा मांडी देऊनी, माझे लक्ष तुझकडे, परि तेच तूझ्या नयनी  ।।३।।   आई – बापाच्या सेवेत,  गुंगलास तूं सतत, सेवा शक्ति मला […]

रात्र सामोरी येतां

रात्र सामोरी येतां, मन कसे कोमेजते, मावळतां दिन सारा, काळोख घेऊनी येते, दिवसाचे तास संपती, असे बघतां-बघतां, स्मृतींच्या इंगळ्या डसती, *संधिप्रकाश* ओसरतां, काळजाचे धागे तुटतां, जिवां हुरहूर लागे,— फक्त “काहूर” तेवढे, मनांत होते जागे,–!! अंधाराची सोबत न्यारी, कुणां अश्रू ना दिसे, आपुल्याच,–रात्री वाटती,– कसे ऋण” फेडायाचे,? सुख–दु:खांचे,हिशोब सारे, नकळत आपुले मन मांडते, सरशी’ कुणाची होते हे, […]

 लक्ष्मीसूत

आशीर्वाद दे ग आई मजला,  विनवितो मी तुझाच पूत्र  । बाबा माझे नसती हयात,  कोण मजला ह्या जगतात  ।। ‘केशव’ माझे वडील असता,  ‘केवशसूत’  हा ठरतो मी  । तसाच बनता  ‘केशवकुमार’,  मोठे होण्याची युक्ती नामी  ।। जगावयाचे जर मोठ्या नामी,  तूच मजला महान आहे  । ‘लक्ष्मी’  तुझे नाव असता, ‘लक्ष्मीसूत’ होण्यात पाहे  ।। डॉ. भगवान नागापूरकर […]

बघता तुला प्रिया रे

बघता तुला प्रिया रे ,– जिवा बेचैनी येते, कासाविशी होता हृदयी, आत *मोरपीस* हलते,–!!! विलक्षण *ओढ* तुझी, काळजाला किती छळते, मूर्त माझ्या अंतरीची, *अढळ अढळ* होतं जाते,–!!! स्पर्श होता तुझा सख्या, माझी न मी असते, बाहूंत तुझ्या विसावण्या, किती काळ मी तरसते,–!!! तुझ्यातच सारे *विश्व* माझे, जगही तोकडे भासे, तुझ्याचसाठी राजसा, मन्मनीचा *चकोर* तरसे,–!!! उषा आणि […]

उगवत्या सूर्याला नमस्कार

उगवता सूर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला    ||धृ|| ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती माना डोलावती, डामडोलाला   ||१|| उगवता सूर्य. नमन करती त्याला   प्रथम हवे दाम, तरच होई काम पैशाच्या भोवती, सारेच फिरती पैशाचे गुलाम, मानती पैशाला    ||२|| उगवता सूर्य, नमन करती त्याला   सत्तेची नशा, दाखवी जना आशा स्वतःसी समजे थोर, […]

1 143 144 145 146 147 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..