नवीन लेखन...

मानवता धर्म

परमेश्वर अगाध ।  त्याच्या शक्तीचा नसे वाद मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती प्रभु निराकार ।  निर्गुण असुनी होई साकार आस्तिक प्रभु मानती ।  नास्तिक समजती शक्ति ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता न प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून वापरुन ज्ञान शक्ति । अनेक धर्म स्थापिती धर्म […]

 व्यर्थची यात्रा

जमले होते असंख्य भाविक, जगंदबेच्या दर्शना  । कांहीं तरी मागत होते,  हात जोडूनी चरणा  ।। दयावान ती आहे समजता,  गर्दी होते तिजपाशीं  । कधी न दिले काहींहीं तिजला,  मग ही मागणी कशी ?  ।। जावू नका दर्शनास तिच्या,  रिक्त अशा त्या हाताने  । तिला पाहिजे ताट पूजेचे,  भरलेले भक्ती भावाने  ।। व्यर्थ होवून जाती ते श्रम, […]

किती रंग या जीवनी पहावे

किती रंग या जीवनी पहावे, कितीदा पुन्हा नव्याने जगावे,रोज रोज नवीन ताजे, दुःख जिवापाड सोसावे,–!! ठरवलेले नेहमी चुकते, विपरीत काही घडते, अगणित अपेक्षांचे ओझे, इवल्या हृदयाने पेलावे,-? जे विधायक, ते दूर राहते, नकारात्मक ते सारे घडते, आपल्याच जिवाचा बळी रोज नव्याने पहावे लागते,-!! मदतीचा हात करता पुढे, आरोपांना पेंव फुटते , आंधळ्या निर्जन आयुष्याला , रानावनीची […]

पडछाया !

चालत असता संथ गतीने, एका वाटेवरती संगे माझ्या, माझी छाया,  मागून येत होती वेगामधली बघुनी तीव्रता, ती ही वाढावी वेग खंड न पडता साथ देणे, हेच तिचे अंग तळपत असता रवि आकाशी, जवळ ती आली समरस होण्या माझ्यामध्ये,  पायी घुटमळली ढळू लागला सूर्य हळू हळू, पश्चिम दिशेला प्रकाशातील तीव्रपणा तो कमी होऊ लागला पडू लागले पावूल माझे मंद मंद आता श्रमलो दमलो बसलो खाली, अंधार तो होता दूर दूर ती जावू लागली, छाया मजला सोडूनी […]

मोक्ष अंतीम फळ

मागील कर्म पुढे चालूनी, कर्माची होई शृखंला, फळ मिळते कर्मावरूनी, मदत होई मुक्तीला ।।१।।   चांगले कार्य करीतेवेळी, मृत्यू येता अवचित, पुनर्जन्म तो मिळूनी तुम्हां, खेचतो त्याच कार्यात ।।२।।   अपूरे झाले असतां कार्य, ज्ञानेश्वराच्या हातून, पुनरपि येऊनी पूर्ण केले, आठरा वर्षे जगून ।।३।।   ध्रुव जगला पांच वर्षे, अढळ पद मिळवी, कित्येक जन्मीचे तपोबल, पांच […]

रंगाच्या उधळूनी लाटां

रंगाच्या उधळूनी लाटां, नाचल्या किती गोपिका, आज पंचमी, रंगात नाहली, विलक्षण गोकुळाची कळा,|| श्रीहरी नावातच हिरवा, निळा रंग गगनाचा, आभाळभर पसरलेला, रंग शोभे तो निळ्या’चा, अस्तित्त्व’ त्याचे आसमानी, आणि सखाहरी तो धरणीचा,|| २ || गोपिका आज नाचल्या टाकुनी सगळ्या बंधना जिवाशिवांचे’ बनले ”अद्वैत””, विसरून साऱ्या तनांमनां, कृष्णा’सम तो कोण सवंगडी, मिळेल त्यांना नेमका,—??? रंगवुनी टाकती, भान […]

आयुष्य वाया घालू नका

दवडू नका आयुष्य तुम्ही,  वेळ घालूनी असा तसा, पदरी येई निराशा तुमच्या,  गेला क्षण येईल कसा….१, मर्यादेतच जीवन असूनी,  गतीमान असते बघा, स्वत: भोवती केंद्रीत होता,  कसे जाणाल इतर जगा….२, ईच्छा असते वाया न जावे,  आयुष्य सारे विनाकारण, हर घडीला विचार असावा,  इतरांसाठी असते जीवन….३, जेंव्हां तुम्ही सेवा करीता,  इतर मनाचे भाव जाणूनी, तेच अर्पण होत […]

 पुजारी – पुरोहित

पुजारी मंडळींचा कारभार, जगदंबेच्या नांवें चालतो  । भाविकामधील अज्ञानाचा,  उपयोग करूनी घेतो  ।।१ पूजेमधल्या विधी करिता,  आग्रह त्यांचा चालत असे । भक्तीरसाचे महत्त्व असूनी,  त्याच्यांत त्यांना रस नसे  ।।२ व्यवहारीपणाचे रूप आणूनी,  बाजारी वृत्ति दाखविती । धर्माचे नाव लावूनी,  भोळ्या भक्तांना लुटत असती  ।।३ पुरोहित असा असावा,  धर्माची करि उकलन । भक्तीमार्गाच्या वाटसरूंना,  योग्य मार्ग  देयी […]

प्रभाते नाम घ्या जगदंबेचे

प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   ।।धृ।।   कांहीं काळासाठीं नव्हता जगाचे पाठीं कोठे तुम्हीं होता न कळे आठवता जाग येऊनी मिळाले   भांडार आठवणींचे   ।।१।। प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   विश्रांतीचा काळ हा शांततेने गेला पहा देह मनाची धावपळ थांवली कांहीं काळ पुनरपि लागते सर्वां   चैतन्य जीवनाचे   ।।२।। प्रभात झाली […]

अंबेस दाखवी काव्य

पाटीवरती अंक लिहीले,  बागडूं लागला आनंदाने पित्याचे लक्ष वेधण्या,  हनवटी खेची हातानें….१, प्रथमापासूनी लक्ष पित्याचे,  होते अवखळपणाकडे अजाणपणा दाखवोनी,  दुर्लक्ष करी मुलाकडे…२, शब्दांची गुंफन करूनी,  कवितेचा संग्रह केला तोच संग्रह घेवून चाललो,  दाखविण्या माहूरी रेणूकेला…३, जगदंबा ही आदी शक्ती,  सारे तिजला ज्ञात असते अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते…४, पाटीवरले अंक बघूनी,  हृदय पित्याचे […]

1 141 142 143 144 145 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..